शारद सुंदर चंदेरी राती,.........2 स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत, घेऊन कवेत, साजणा झुलव मला
साजणा ऐक नारे
तुझ्याचसाठी रे तुझ्याचसाठी, सगे सोयरे मी सांडीले पाठी.......2शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत, घेऊन कवेत, साजणा झुलव मला
मोहन मधूर राती, भराला येऊ दे प्रीती,
प्रीतीची ही जनरीती, कशाला कुणाची भिती
झाडामागे......... चांद हा वरती आला
ये ना ये ना, आतूर जीव हा झाला
मी भूलावे, स्वैर व्हावे, गीत गावे
शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत, घेऊन कवेत, साजणा झुलव मला
वार्यात लहर मंद, फुलांचा मादक गंध ,
मोगरा चमेली कुंद, जीवाला करीती धूंद,
माझ्या देही.... पूनव चांदणे साजे,
प्राणामध्ये..... प्रीतीची पावरी वाजे
आज राया, धूंद काया, मोह माया
शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलतो झुला
थंड या हवेत, घेऊन कवेत, साजणा झुलव मला