Tuesday, December 31, 2013

Sar Sukhachi Shravani / सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा

 
 
 
 
 
गुणगुणावे गीत वाटे, शब्द मिळू दे थांब ना 
हूल कि चाहूल तू इतके कळू दे थांब ना 
गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांब ना 
तोल माझा सावरू दे थांब ना 

सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा 
गुंतण्या आतुर फिरुनी आज वेडा जीव हा 

सापडाया लागले मी ज्या क्षणी माझी मला 
नेमका वळणावरी त्या जीव हा भांबावला 
खेळ हा तर कालचा पण आज का वाटे नवा 
कालचा हा खेळ बघ वाटे नवा 

बावऱ्या माझ्या मनाचे उलगडेना वागणे 
उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे 
वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा 
उंबऱ्यापाशी उन्हाचा चांदवा

Monday, December 30, 2013

mala ved lagale premache, timepass




रंग बावऱ्या स्वप्नांना 
सांगा रे सांगा …
कुंद कळ्यांना  वेलींना 
सांगा रे सांगा … 
हे भास होती कसे  
हे नाव ओठी कुणाचे 
का सांग वेड्या मना 
मला भान नाही जगाचे 
मला वेड लागले प्रेमाचे
मला वेड लागले प्रेमाचे 
प्रेमाचे   … प्रेमाचे … 


जगणे नवे वाटे मला 
कुणी भेटला माझा मला 
खुलता काळी मलूल हा 
मन मोगरा गंधाळला
हा भास कि तुझी आहे नशा
मला साद घालती दाही दिशा 
मला वेड लागले प्रेमाचे 
मला वेड लागले प्रेमाचे 
प्रेमाचे   … प्रेमाचे …