Thursday, November 6, 2014

Jeev Bhulala - Full Video Song - Lai Bhaari - Sonu Nigam, Shreya Ghoshal - Marathi Romantic Song

 
जीव भुलला, रुणझुणला,
का असा सांग ना रे, श्वास हा गंधाळला 

क्षण हळवा गुणगुणला,
बावऱ्या या क्षणा श्वास हा गंधाळला 

सूर हे छेडती, स्पंदने वेडी कोणती 
बोलके होती स्पर्श सारे हे इशारे बोलती 
भावनांचे शब्द व्हावे गीत ओठी मोहरावे 
हरपुनी हे भान जावे, ये जरा 

दडले या मनी ते ही तू घ्यावे जाणूनी 
सांगती डोळे गुज सारे आवरावे मी किती 
प्रेमरंगी मी भिजावे ते तुला ही जाणवावे 
पांघरावे मी तुला अन ये जरा