Tuesday, March 22, 2016

Jeev Ha Sang Na Full Song with Lyrics | Tu Hi Re | Swwapnil, Sai, Tejaswini Pandit


कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारी चा सांग विझवावा
कशापाई जडवावा
गुंतवावा सोडवावा
कितीदा नि कुणासाठी
आसवात भिजवावा
जीव हा… सांग ना
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारी चा सांग विझवावा ।। ध्रु ।।

सैरभैर झालं मन
हरपल देह भान
उरात घाव सलतो
नाही तोल काळजाला
कसं समजावू त्याला
तुझ्यात गुरफटतो
जीव हा… सांग ना… सांग ना… ।। १ ।।

जिथे तिथे तुझी हूल
सोसवेना तुझी भूल
तुझाच भास भवती
कसं रोखू सांग मला
पापण्यांच्या सागराला
तुझ्याच पायी भरती ।। २ ।।

No comments:

Post a Comment