ढग दाटूनी येतात, मन वाहूनी नेतात ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी जातात झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची सर येते, माझ्यात.. माती लेऊनीया गंध, होत जाते धुंद धुंद तिच्या अंतरात खोल अंकुरतो एक बंध मुळे हरखूनी जातात, झाडे पाऊस होतात ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची सर येते, माझ्यात.. सुंबरान गाऊ या रं सुंबरान गाऊ या झिलरी झिलरी आम्ही तुम्ही सुंबरान गाऊ या सुंबरान गाऊ या रं सुंबरान गाऊ या जीव होतो ओला चिंब, घेतो पाखराचे पंख सार्या आभाळाला देतो एक ओलसर रंग शब्द भिजूनी जातात अर्थ थेंबांना येतात ऋतु पावसाळी सोळा थेंब होऊनी गातात झिम्मड पाण्याची, अल्लड गाण्याची सर येते, माझ्यात..
Showing posts with label Dhag datuni Yetat -Marathi song-Marathi Movie : Aie Shappath. Show all posts
Showing posts with label Dhag datuni Yetat -Marathi song-Marathi Movie : Aie Shappath. Show all posts
Monday, March 16, 2015
Dhag datuni Yetat -Marathi song-Marathi Movie : Aie Shappath
Subscribe to:
Posts (Atom)