किती सांगायचय......
किती सांगायचय मला किती सांगायचय
कोरडया जगात माझ्या,
भोवती चार भिंती
बोचरे नकार सारे
आशा क्षणात विरती
बेचैन स्वप्नांची अन पाखरे हरून जाती
मनाच्या पाऱ्याला आवरू किती
किती सांगायचय मला ......किती सांगायचय
किती सांगायचय मला तुला .... किती सांगायचय.......४
मनाच्या पाऱ्याला असे स्वप्नांचे बहर
मनाच्या आभाळी अशी ओले ती लहर
मनाच्या या गावी असे दोघांचेच घर
घेऊदे मनाला श्वास मोकळा
किती सांगायचय मला ......किती सांगायचय
किती सांगायचय मला तुला .... किती सांगायचय