विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल तुला साद आली तुझ्या लेकरांची अलंकापुरी आज भारावली वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली गळाभेट घेण्या भिमेची निघाली तुझ्या नामघोषात इंद्रायणी विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी जिवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली माऊली माऊली, माऊली माऊली माऊली माऊली, रूप तुझे विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल चालतो रे तुझी वाट रात्रंदिनी घेतला पावलांनी वसा टाळ घोषातुनी साद येते तुझी दावते वैष्णवांना दिशा दाटला मेघ तू सावळा, मस्तकी चंदनाचा टिळा लेऊनि तुळशी माळा गळा ह्या, पाहसी वाट त्या राऊळा आज हारपलं देहभान, जीव झाला खुळा बावळा पाहण्या गा तुझ्या लोचनांत भाबड्या लेकरांचा लळा भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची उभी पंढरी आज नादावली तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी जिवाला तुझी आस गा लागली जरी बाप साऱ्या जगाचा परि तू आम्हा लेकरांची विठू माऊली माऊली माऊली, माऊली माऊली माऊली माऊली, रूप तुझे विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल चालला गजर जाहलो अधिर लागली नजर कळसाला पंचप्राण हे तल्लीन आता पाहीन पांडुरंगाला देखिला कळस डोईला तुळस धावितो चंद्रभागेसी समिप ही दिसे पंढरी याच मंदिरी माऊली माझी मुख दर्शन व्हावे आता तू सकल जगाचा त्राता घे कुशीत गा माऊली तुझ्या पायरी ठेवतो माथा माऊली माऊली, माऊली माऊली माऊली माऊली, माऊली माऊली पुंडलिक वरदे हारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय
Showing posts with label Lai Bhari. Show all posts
Showing posts with label Lai Bhari. Show all posts
Sunday, March 15, 2015
Mauli Mauli Marathi Song - Lai Bhari song by Ajay Atul
Subscribe to:
Posts (Atom)