कधी वाटे मन का हरवते
आसू लपवून का मिरवते
हे प्रेम की यातना
नवे नाते रोज गोड भेटी
आता सजा नाव येता ओठी
हे प्रेम की यातना
आजुबाजू मोठी कुंपणे, नको मरणाला जुंपणे
हे प्रेम की यातना
पाखरू हृदयातले मनमानी करी
बहर ते कोमेजले, वणवा का उरी
मनास वाटले, डोळ्यात साठले
आभाळ फाटले का अंतरी
आठवती सारे राग रुसवे
नाही खरे काही भास फसवे
हे प्रेम की यातना
कधी वाटे मन का हरवते
आसू लपवून का मिरवते
हे प्रेम की यातना
नवे नाते रोज गोड भेटी
आता सजा नाव येता ओठी
हे प्रेम की यातना
आजुबाजू मोठी कुंपणे, नको मरणाला जुंपणे
हे प्रेम की यातना