दिस चार झाले मन, पाखरू होऊन X 2
(पानपान आर्त आणि ) X 2 झड बावरून
दिस चार झाले मन, पाखरू होऊन X 2
सांजवेळी जेव्हा येई आठव आठव X 2
दूर कुठे मंदिरात होई घंटारव
उभा अंगावर राही काटा सरसरून
दिस चार झाले मन, पाखरू होऊन X 2
ला ला ... ला ला ला
नकळत आठवणी जसे विसरले X २
वाटेवर इथे तसे ठसे उमटले
दूर वेडेपिसे सूर सनईभरून
दिस चार झाले मन, पाखरू होऊन X 2
झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा X 2
आता जरी आला इथे ऋतु वसंताचा
ऋतु हा सुखाचा इथला गेला ओसरून
दिस चार झाले मन, पाखरू होऊन X 2
(पानपान आर्त आणि ) X 2 झड बावरून
दिस चार झाले मन, पाखरू होऊन X 2
Dis char zhale mann… o pakharu houn
Song – Dis Char Jhale Man
Movie Aai Shapath…! (2006)
Lyrics Saumitra
Music Ashok Patki
Singer Sadhana Sargam