Sunday, June 3, 2012

O Raje



हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी

झटकून टाक ती राख, नव्याने जाग, पेटू दे आग मराठी आता.......... २
डोळ्यांत फुटे अंगार भगवा, रक्‍तात जागू दे आज भवानी माता
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी
हर महादेव। ……

हृदयात जागू दे पुन्हा आता रांगडा जोश
दाही दिशीं घुमू दे शिवछत्रपतींचा घोष......... २
लढण्या संग्राम आज हा
बळ दे या मनगटी आम्हां
करण्या संहार शत्रूचा, जन्म घे पुन्हा आता
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी

तलवार नाचते रणी, ऐसा पेटतो राग
जगो मरो जीव हा, फुले महाराष्ट्राची बाग......... २
जगण्या सिद्धांत आज हा, शक्‍ती दे शतपटी आम्हां
चल चल रे ऊठ घालिते साद मराठी आता
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी

झटकून टाक ती राख, नव्याने जाग, पेटू दे आग मराठी आता.......... २
डोळ्यांत फुटे अंगार भगवा, रक्‍तात जागू दे आज भवानी माता
हे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी
हर महादेव। ……

No comments:

Post a Comment