दिवस ओल्या पाकळ्यांचे, जाणिवांना गंध ओले
स्पंदने बेभान आणि हात हाती गुंफलेले
दिवस वेडे स्वप्नपंखी रेशमाची झूल झाले
ओंजळीने मागण्या आधीच झरले मेघ सारे
दिवस थोडे स्पर्श वेडे दोन आतुरल्या जीवांचे
हरवलेले भान केवळ श्वास होते बोललेले
दिवस मोहरल्या मनाचे सुख नवे घेऊन आले
चांद थोडा लाजला अन् चांदणे टिपूर झाले
No comments:
Post a Comment