Saturday, August 2, 2014

Diwas Tujhe Hey Phulayche !!! Marathi Song.



 
 (दिवस  तुझे  हे  फुलायचे  -2
झोपाळ्यावाचून    झुलायचे    )-2

(स्वप्नात  गुंगत  जाने
वाटेत  भेटते  गाणे ) – 2

गाण्यात  हृदय  झुरायचे    -2
झोपाळ्यावाचून   झुलायचे    – २
दिवस  तुझे  हे  फुलायचे
झोपाळ्यावाचून    झुलायचे 

मोजावी  नभाची  खोली , घालावी  शपथ  ओली  - २
श्वासात  चांदणे  भरायचे  - ३
झोपाळ्यावाचून  झुलायचे  -२
दिवस  तुझे  हे  फुलायचे
झोपाळ्यावाचून  झुलायचे

(थरारे  कोवळी  तार
 सोसेना  सुरांचा  भार ) -२

फुलांनी  जखमी  करायचे  -३
झोपाळ्यावाचून  झुलायचे  -२
दिवस  तुझे  हे  फुलायचे
झोपाळ्यावाचून  झुलायचे

(माझ्या  या  घरच्यापाशी
थांब  तू  गडे  जराशी  ) -२
(पापण्या  मिटून  भुलायचे ) - ३
झोपाळ्यावाचून  झुलायचे    -२
दिवस  तुझे  हे  फुलायचे
झोपाळ्यावाचून  झुलायचे

No comments:

Post a Comment