Tuesday, March 22, 2016
Kashyala Lavato (Lavani Song) - Poshter Girl | Marathi Songs with lyrics 2016 | Rasika Dhabadgaonkar
धडाचं नाही तुमचं बियानं
तेनंच लावलिया वाट
लई कसाची जमीन माझी
तिला कश्शाला लावतोस नाट..
पेरतोस मिरची कोल्हापुरची नी
उसाची धरतोस आशा
रिकाम्या हिरीला ईंजान लावतोस
हायब्रीड तुझा तमाशा
नुस्याच करतोस बाराच्या वार्ता
हिशेब पावने आठ..
लई कसाची जमीन माझी तिला
कश्शाला लावतोस नाट..
खुळं पाखरू तुझ्या जीवाचं
झुरतय कोनापाई
कशाला ठेवतंय चोच रिकामी
दान्याला म्हंतय नाही
सुगीच सांगतेय लूटून जाया
शिवार बिनबोभाट
लई कसाची जमीन माझी
तिला कश्शाला लावतोस नाट..
Jeev Ha Sang Na Full Song with Lyrics | Tu Hi Re | Swwapnil, Sai, Tejaswini Pandit
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारी चा सांग विझवावा
कशापाई जडवावा
गुंतवावा सोडवावा
कितीदा नि कुणासाठी
आसवात भिजवावा
जीव हा… सांग ना
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारी चा सांग विझवावा ।। ध्रु ।।
सैरभैर झालं मन
हरपल देह भान
उरात घाव सलतो
नाही तोल काळजाला
कसं समजावू त्याला
तुझ्यात गुरफटतो
जीव हा… सांग ना… सांग ना… ।। १ ।।
जिथे तिथे तुझी हूल
सोसवेना तुझी भूल
तुझाच भास भवती
कसं रोखू सांग मला
पापण्यांच्या सागराला
तुझ्याच पायी भरती ।। २ ।।
Sang Na Re Mana - Zenda- Marathi movie
अंतरी वाजती प्रीतीची पैंजणे आणि धुंदावती भाबडी लोचने होतसे जीव का घाबरा सांग ना, सांग ना रे मना श्वास गंधाळती, शब्द भांबावती, रोमरोमांतली कंपने बोलती मोहरे-मोहरे पाकळी-पाकळी, भारलेल्या जीवा आवरावे किती का अशा जागल्या सांग संवेदना, सांग ना रे मना हे नवे भास अन् ह्या नव्या चाहुली, ऐकू ये कोठुनी साद ही मल्मली गोठले श्वास अन् स्पंदने थांबली, हे शहारे जणू रेशमाच्या झुली आज ओथंबल्या का अशा भावना, सांग ना रे मना
Subscribe to:
Posts (Atom)