Showing posts with label Sai. Show all posts
Showing posts with label Sai. Show all posts

Tuesday, March 22, 2016

Jeev Ha Sang Na Full Song with Lyrics | Tu Hi Re | Swwapnil, Sai, Tejaswini Pandit


कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारी चा सांग विझवावा
कशापाई जडवावा
गुंतवावा सोडवावा
कितीदा नि कुणासाठी
आसवात भिजवावा
जीव हा… सांग ना
कसा सांग उरातला घाव विसरावा
वनवा हा जिव्हारी चा सांग विझवावा ।। ध्रु ।।

सैरभैर झालं मन
हरपल देह भान
उरात घाव सलतो
नाही तोल काळजाला
कसं समजावू त्याला
तुझ्यात गुरफटतो
जीव हा… सांग ना… सांग ना… ।। १ ।।

जिथे तिथे तुझी हूल
सोसवेना तुझी भूल
तुझाच भास भवती
कसं रोखू सांग मला
पापण्यांच्या सागराला
तुझ्याच पायी भरती ।। २ ।।

Monday, August 24, 2015

Tola Tola | Official Marathi Song With Lyrics | Bela Shende, Amitraj | Tu Hi Re | Swwapnil, Sai, Tejaswini Pandit


तोळा तोळा ........
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो.......2
हरवूनी तुझ्यात मी पुन्हापुन्हा का
नाव तुझे गुणगुणतो....
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो ।। ध्रु ।।

ती : तुझ्या नशील्या नजरेत मीही गुरफटते
शहारते रे मन वेडे तुझ्यातच विरते
तो : हसता तू जरा खोल काळजात हुळहुळे
बोलणे सांगणे सारे ओठांवर अडखळे
हरवूनी तुझ्यात मी पुन्हापुन्हा का नाव तुझे गुणगुणतो.. ।। १ ।।
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो

तो : तुझाच होतो जगणेही माझे मी विसरतो
करु नयेते सारे काही तुझ्यासाठी करतो
ती : ऐक ना एकदा तुझे नाव माझ्या श्वासातले
नेमके सांगना काय नाते तुझ्या माझ्यातले
हरवूनी तुझ्यात मी पुन्हापुन्हा का नाव तुझे गुणगुणतो.. ।। २ ।।
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो.