Saturday, March 16, 2019

govyachya kinaryavar ruperi valu soneri lata marathi song jaya rajput रुपेरी वाळू सोनेरी लाटा त्यावर माझं वर्क तरतय..




हाय्या हो .......हाय्या हो ........
रुपेरी वाळू सोनेरी लाटा
त्यावर माझं वर्क तरतय........२
कोणी देशी  नेऊ कोणी गावी नेऊ
सांग तुझ्या मनात काय घडतंय ....... ३

गोव्याच्या किनाऱ्यावर नाखवा व्हाडीने नेशील का
नीर सागरी दुनियेची सफर देशील का ........
हाय्या हो .......हाय्या हो ........

नको बघू असं मनी होतंय कसं
माझ्या काळजात भरलीय लाज
तुझ्या नजरेच्या जाल्यामंदी
काळीज गुतलं आज ........
गोव्याच्या किनाऱ्यावर नाखवा व्हाडीने नेशील का
गोव्याच्या किनाऱ्यावर नाखवा बेगीन नेशील ना .........

इच्छा तुझे  मनी  येवो माझे ध्यानी
न सांगता समजल का त्या गोव्याच्या बाजारानु
हात हाती देशील का .........

ऐशे गोवे शहरानं जरी नेशील संगण
एक हौस माझी पुरवाल का .......
माझ्या एकविरा माऊलीच दर्शन घडवाल का ........

रुपेरी वाळू सोनेरी लाटा
त्यावर माझं वर्क तरतय........२
कोणी देशी  नेऊ कोणी गावी नेऊ
सांग तुझ्या मनात काय घडतंय ....... ४
हाय्या हो .......हाय्या हो ........ २

1 comment: