Showing posts with label Fite Andharache Jale marathi song. Show all posts
Showing posts with label Fite Andharache Jale marathi song. Show all posts

Tuesday, May 6, 2014

Fite Andharache Jale marathi song

फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
दरीखोर्‍यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश................ २

रान जागे झाले सारे पायवाटा जाग्या झाल्या......... २
सूर्य जन्मता डोंगरी संगे जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य आले भरास भरास
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश

दंव पिऊन नवेली झाली गवताची पाती........... २
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी
क्षणापूर्वीचे पालटे जग उदास उदास
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश

झाला आजचा प्रकाश जुना कालचा काळोख....... २
चांदण्याला किरणांचा सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरीही नवा सुवास सुवास
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
दरीखोर्‍यांतून वाहे एक प्रकाश प्रकाश................ २