Showing posts with label MAN RANAT GEL. lovely song picturised on Little naughty Mukta Barve sung by Shreya Ghoshal. Show all posts
Showing posts with label MAN RANAT GEL. lovely song picturised on Little naughty Mukta Barve sung by Shreya Ghoshal. Show all posts

Wednesday, May 21, 2014

MAN RANAT GEL. lovely song picturised on Little naughty Mukta Barve sung by Shreya Ghoshal

मन रानात गेलं ग, पानापानांत गेलं ग
मन चिंचेच्या झाडात, अंब्याच्या पाडात गेलं ग

बिल्लोरी खिल्लोरी सांज सांज पाहु ग
झिम्माड वारा होऊ ग
लबाड या तार्‍याला थांब थांब सांगु ग
चांदाला हात लावु ग
भिरभिरल्यावानी ही धरती फुलारं
कळीला जाग आली ग
थरथरल्यावानी हे नाचं शिवार
कळीचं फूल झालं ग
भानात, रानात हे धुंदधुंद झालं मन... रानात गेलं ग !

सर्राट ह्या आभाळी उंच उंच जाऊ ग
वार्‍याचं पंख होऊ ग
थर्राट पाण्यामंदी चिंब चिंब न्हाऊ ग
ढगाचा झोका होऊ ग
शिरशिरल्यावाणी ही झाडं चुकार
पानाची साद देती ग
सरसरल्यावानी ही माती हुंकारं
रंगांचा नाद होई ग
भानात, रानात हे धुंदधुंद झालं मन... रानात गेलं ग !