Showing posts with label Morya Morya - Superhit Ganpati Song - Ajay-Atul - Uladhaal Marathi Movie. Show all posts
Showing posts with label Morya Morya - Superhit Ganpati Song - Ajay-Atul - Uladhaal Marathi Movie. Show all posts

Wednesday, May 21, 2014

Morya Morya - Superhit Ganpati Song - Ajay-Atul - Uladhaal Marathi Movie

हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया
तुझ्या इना माणसाचा जन्म जाई वाया

हे देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी समिंदराची माया
मोरया.. मोरया.. मोरया.. मोरया..

ॐकाराचं रूप तुझं चराचरामंदी
झाड-येली-पानासंगं फूल तू सुगंधी
भगताचा पाठिराखा गरिबाचा वाली
माझी भक्‍ती - तुझी शक्‍ती एकरूप झाली
देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी समिंदराची माया
मोरया.. मोरया.. मोरया.. मोरया..

आदि-अंत तूच खरा, तूच बुद्धी दाता
शरण मी आलो तुला पायावर माथा
डंका वाजं दहा दिशी, गजर नावाचा
संकटाला बळ देई अवतार देवाचा
देवा दिली हाक उद्धार कराया
आभाळाची छाया तुझी समिंदराची माया
मोरया.. मोरया.. मोरया.. मोरया..

गणपति बाप्पा मोरया मंगलमूर्ति मोरया
मोरया.. मोरया.. मोरया.. मोरया..