Showing posts with label Nisarg Raja Aik Sangato. Show all posts
Showing posts with label Nisarg Raja Aik Sangato. Show all posts

Tuesday, May 6, 2014

Nisarg Raja Aik Sangato marathi song


निसर्गराजा ऐक सांगते गुपित जपलं रे
कुणी माझ्या मनात लपलंय्‌ रे

तो दिसला अन्‌ मी पाहिले -- पाहिले परि ते कुर्रयाने
डोळ्यांत इशारे हसले -- हसले ते मोठ्या तोर्‍याने
हे कसे न त्याला कळले -- कळले न तुझ्या त्या ओठाने
ओठ न हलले शब्द न जुळले, थोडे चुकले रे

का चाललात ? -- तुम्ही आलात म्हणून
जरा थांबा ना -- का ? -- वा छान दिसतंय्‌ ! -- काय ?
हे रूप भिजलेलं -- आणि ते पहा -- काय ?
अन्‌ तुमचं मनही भिजलेलं -- कशानं ?
प्रेमानं प्रेमानं प्रेमानं
निसर्गराजा ऐक सांगतो  गुपित जपलं रे
कुणी माझ्या मनात लपलंय्‌ रे

तो भाव प्रीतिचा दिसला -- दिसला मग संशय कसला ?
हा नखरा का मग असला ? -- असला हा अल्लड चाळा
प्रेमात बहाणा कसला ? -- कसला तो प्रियकर भोळा !
प्रीत अशी तर रीत अशी का, कोडं पडलंय रे
कुणी माझ्या मनात लपलंय्‌ रे
निसर्गराजा ऐक सांगतो