Showing posts with label Ushakal Hota Hota Kal Ratra Zhali Asha Bhosale marathi song. Show all posts
Showing posts with label Ushakal Hota Hota Kal Ratra Zhali Asha Bhosale marathi song. Show all posts

Tuesday, May 6, 2014

Ushakal Hota Hota Kal Ratra Zhali Asha Bhosale marathi song


उषःकाल होता होता काळरात्र झाली !
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !........ २

आम्ही चार किरणांचीही आस का धरावी ?...... २
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी ?....... २ 
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली !...... २
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !
उषःकाल होता होता काळरात्र झाली !

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती,........ २
आम्हावरी संसारची उडे धूळमाती !......... २
आम्ही ती स्मशाने ज्यांना प्रेतही ना वाली !........ २
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !
उषःकाल होता होता काळरात्र झाली !
उभा देश झाला आता एक बंदिशाला।........२
जिथे देवकीचा पान्हा दुधाने जळाला !........ २
कसे पुण्य दुर्दैवी अन्‌ पाप भाग्यशाली !.......... २
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !
उषःकाल होता होता काळरात्र झाली !
धुमसतात अजुनी विझल्या चितांचे निखारे !........ २
अजुन रक्‍त मागत उठती वधस्तंभ सारे !......... २
आसवेच स्वातंत्र्याची अम्हाला मिळाली !......... २
अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !
उषःकाल होता होता काळरात्र झाली ! अरे, पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली !