Showing posts with label sung by Asha Bhosale. Show all posts
Showing posts with label sung by Asha Bhosale. Show all posts

Wednesday, May 21, 2014

Dis Jatil Dis Yetil !!! Marathi song

तुझ्यामाझ्या या संसाराला आनि काय हवं
तुझ्यामाझ्या या लेकराला घरकुल नवं
नव्या घरामंदी काय नवीन घडलं
घरकुलासंगं सम्दं येगळं होईल
दिसं जातील, दिसं येतील
भोग सरंल, सुख येईल

अवकळा सम्दी जाईल निघुनी
तरारेल बीज तुजं माझ्या कुशीतुनी
मिळंल का त्याला ऊन वारा पानी ?
राहील का सुकंल ते तुझ्यामाझ्यावानी ?
रोप अपुलंच पर होईल येगळं
दैवासंग झुंजायाचं देऊ त्याला बळ

ढगावानी बरसंल त्यो, वार्‍यावानी हसवंल त्यो
फुलावानी सुखवील, काट्यांलाबी खेळवील
समद्या दुनियेचं मन रिझवील त्यो
असंल त्यो कुनावानी, कसा ग दिसंल
तुझ्यामाझ्या  जीवाचा त्यो आरसा असंल

उडुनिया जाईल ही आसवांची रात
अपुल्याचसाठी उद्या फुटंल पहाट
पहाटच्या दंवावानी तान्हं तुजंमाजं
सोसंल ग कसं त्याला जीवापाड ओझं
इवल्याशा पणतीचा इवलासा जीव
त्योच घेई परि समद्या अंधाराचा ठाव
दिसं जातील, दिसं येतील.......२
भोग सरंल, सुख येईल ........२