पेटलं आभाळ सार पेटला हा प्राण रे
उठला हा जाळ आतून करपल रान रे
उजळ्तांना जळून गेलो राहील ना भान
डोळ्यातल्या पाण्याने हि भिजेना तहान
दूर दूर चालली आज माझी सावली.........२
कशी सांज हि उरी गोठली
उरलो हरलो दुखः झाले सोबती .............२
काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला
मी इथे अन तो तिथे हा खेळ आता संपला
मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा
रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा
आपुलाच तो रस्ता जुना.......२ मी एकटा चालू किती
उरलो हरलो दुखः झाले सोबती .............२
लाभतो सारा दिलासा कोणता केला गुन्हा
जिंकुनी हि खेळ सारा हारते मी का पुन्हा
त्रास लाखो भास लाखो कोणते मानू खरे
उरण्या त्या पावसाचे घाव मनावर का चढे
समजावतो मी या मना..............२
तरी आसवे का वाहती