रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना.......२ ,बनात ये ना, जवळ घे ना........२
चंदेरी चाहूल, लावित प्रीतीत ये ना......२ ,
प्रीतीत ये ना, जवळ घे ना.........२ ll ध्रु ll
बेधुंद आज आसमंत सारा, कुंजात गात मंद धुंद वारा
दाटे उरी प्रिया तुझा इशारा, देहा वरी फुले असा शहारा..... तुझा इशारा, असा शहारा
रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना
चंदेरी चाहूल, लावित प्रीतीत ये ना, प्रीतीत ये ना, जवळ घे ना.........२ ll १ ll
लाजेत आज ही फुले नहाती, गाली अनार प्रीत गीत गाती
तू ये निशा अशी करे पुकारा, दे ये प्रिया मला तुझा निवारा..... तुझा निवारा, तुझा निवारा
रुपेरी वाळूत, माडांच्या बनात ये ना
चंदेरी चाहूल, लावित प्रीतीत ये ना, प्रीतीत ये ना, जवळ घे ना.........३ ll २ ll
Song :- Ruperi Valut Madanchya Banat Yena
Singer :- Asha Bhosale
No comments:
Post a Comment