Sunday, April 8, 2012

Fulale Re Kshan Maajhe - Asha Bhosale



फुलले रे....2 क्षण माझे फुलले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे
मेंदीने, शकुनाच्या, शकुनाच्या....... मेंदीने,
सजले रे क्षण माझे सजले रे फुलले रे क्षण माझे फुलले रे                                                ll ध्रु ll

झुळूक वार्‍याची आली रे लेऊन कोवळी सोनफूले
साजण स्पर्शाची जाणिव होऊन, भाळले मन खुळे
झुळूक वार्‍याची आली रे लेऊन कोवळी सोनफूले
साजण स्पर्शाची जाणिव होऊन, भाळले मन खुळे
या वेडाचे......, या वेडाचे, नाचरे भाव बिलोरे मेंदीने, शकुनाच्या....... मेंदीने,
खुलले रे क्षण माझे खुलले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे                                               ll १ ll

ओढ ही बेबंद, श्वासात, ध्यासात, स्वप्नात येणे तुझे
भांबावल्या माझ्या उरात, स्पर्शात रेशिम काटे तुझे
ओढ ही बेबंद, श्वासात, ध्यासात, स्वप्नात येणे तुझे
भांबावल्या माझ्या उरात, स्पर्शात रेशिम काटे तुझे
मनमोराचे....., मनमोराचे, जादूभरे हे पिसारे मेंदीने, शकुनाच्या.... मेंदीने,
हसले रे क्षण माझे हसले रे, सजले रे क्षण माझे सजले रे                                                  ll २ ll

प्रीत ही, प्रीत ही उमजेना जडला का जीव हा समजेना......२ 
कशी सांगू मी, कशी सांगू मी.....२  माझ्या मनीची कथा रे मेंदीने, शकुनाच्या..... मेंदीने,
भुलले रे क्षण माझे भुलले रे....२
मेंदीने, शकुनाच्या, शकुनाच्या...... मेंदीने, सजले रे क्षण माझे सजले रे                                ll ३ ll
हसले रे क्षण माझे हसले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे

Song :- Fulale Re Kshan Maajhe
Singer :- Asha Bhosale

No comments:

Post a Comment