Tuesday, August 25, 2015

"SAWALI UNHAMADE" / Tejeshree Pradhan / Swapnil Bandodkar / Marathi Album Song with Lyrics



सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मानी थेंब अलुवार तू दवाचा।। 
अबोली फुलामध्ये तशी तू माझ्या मनी, मोह बेधुंद तू मनाचा... 
विखरून चांग रात काळजात माझिया मोह रे चेहरा तुझा. 

सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी, थेंब अलुवार तू दवाचा. 

ही सांज या तारकांची, हॄदयी नक्षी तुझ्या रूपाची. 
टपटपतो मनी तुझाच मोगरा. तुझियासाठी होइ जीव बावरा. 
विसरून या जगास आसपास मी तुझ्या वाटतो आसरा तुझा. 

सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी थेंब अलुवार तू दवाचा. 

झुरतो झुलतो सदा थरारे, जीव हा माझा तुला पुकारे. 
दे दाटुनी ओथंबुनी वीरही सरहि या जीवनी. 
भिजवून जा अशीच जीवनास माझिया लागूदे तुझी तृषा. 

सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी थेंब अलुवार तू दवाचा... समाप्त

RADHA RADHA / Swapnil Bandodkar/ Urmilla Kanitkar / marathi album song with lyrics


राधा राधा राधा राधा राधा राधा
राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा 
चंद्रावानी मुखडा तिचा जीव झालाय आधा आधा ।।२।। 
व्हट जणू पिळलया डाळींबाच दाण 
मोट मोट डोळ जशी कर्दळीची पान ।।२।। 
काप्पाळीच्या शालूलाबी बटांचा भारी कशिदा 
राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा 
चंद्रावानी मुखडा तिचा जीव झालाय आधा आधा ।।२।। 
कुणीतरी सांगा अशी रुसू नको बाई 
कृष्णाला या तिच्याविना कुणी सुद्धा नाही 
गोपिकांचा नाद सोडून कान्हा झालाय सिधा साधा
राधा राधा राधा माझी राधा कुठे गेली बघा 
चंद्रावानी मुखडा तिचा जीव झालाय आधा आधा 
राधा राधा राधा राधा राधा राधा

Jaguni Ghe Zara | Welcome Zindagi | Swapnil Joshi & Amruta Khanvilkar l Marathi Song With Lyrics


जगुनी  घे  जरा  सांगतो  क्षण  हा   आज  चा
विसरू  कालच्या  उद्याच्या  चिंता  हि  जरा
हि  तुझी  जिंदगी   दो  क्षणांची  नशा
दे  जरा  आज  तू  हात  हाती  तिच्या
जगुनी  घे  जरा  सांगतो  क्षण  का  आज  चा
विसरू  कालच्या  उद्याच्या  चिंता  हि  जरा

या  मनाला   नवे  पंख  देऊ
पापण्यांना  नवे  स्वप्न  देऊ
(भिडू  दे  या  जीवनाला
दिसण्या  आधी  सुखाला
फिरसे  चल  गावू  यांना  ये  जरा ) – २
उधान  वारे  नवे  किनारे
मुठीत  तारे  येतील  सारे
सूर  जेवणाचे  खुशाल  छेडू  जरा
जगुनी  घे  जरा  सांगतो  क्षण  का  आज  चा
विसरू  कालच्या  उद्याच्या  चिंता  हि  जरा

शोध  साऱ्या  तुझ्या   तूच  वाटा
हो  किनारा  तुझा  तूच  आत्ता
(मिळूनी  चल  झेलुया   ये  सगळ्या  बे  धुंद   लाटा
पिऊया  तुफान  सारे  ये  जरा ) – २
नकोच  आत्ता  डोळ्यात  पाणी
तुझ्याच   साठी  असेल  कोणी
सूर  जीवनाचा  खुशाल  छेडू  जरा

Monday, August 24, 2015

Tola Tola | Official Marathi Song With Lyrics | Bela Shende, Amitraj | Tu Hi Re | Swwapnil, Sai, Tejaswini Pandit


तोळा तोळा ........
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो.......2
हरवूनी तुझ्यात मी पुन्हापुन्हा का
नाव तुझे गुणगुणतो....
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो ।। ध्रु ।।

ती : तुझ्या नशील्या नजरेत मीही गुरफटते
शहारते रे मन वेडे तुझ्यातच विरते
तो : हसता तू जरा खोल काळजात हुळहुळे
बोलणे सांगणे सारे ओठांवर अडखळे
हरवूनी तुझ्यात मी पुन्हापुन्हा का नाव तुझे गुणगुणतो.. ।। १ ।।
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो

तो : तुझाच होतो जगणेही माझे मी विसरतो
करु नयेते सारे काही तुझ्यासाठी करतो
ती : ऐक ना एकदा तुझे नाव माझ्या श्वासातले
नेमके सांगना काय नाते तुझ्या माझ्यातले
हरवूनी तुझ्यात मी पुन्हापुन्हा का नाव तुझे गुणगुणतो.. ।। २ ।।
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो.

Sundara | Marathi Song With Lyrics | Tu Hi Re | Adarsh Shinde | Swwapnil, Sai Tamhankar, Tejaswini Pandit


जलपरी फार लाजरी, प्रीतबावरी, लाविते छंद
भरजरी शालू अंजीरी, मदन मंजिरी, फिरे स्वच्छंद
रतीरूप अजिंठा शिल्प, कोरिले कुणी, उभी सत्कारा...
हे सुंदरा
को.-
गजगजीत कोवळी काया की बाभळ तरणी ताठी
तू नटून थटून येता, उठतात वादळे मोठी
नजरेचे मारुनी तीर, कैकास करी घायाळ
तू पोर द्वाड मुलखाची, लई अवखळ धीट खट्याळ
सुंदरा असावी कशी..
सुंदरा असावी कशी, अप्सरा जशी, वेणीमधे गजरा
सारं शिवार गातय गाणं, तिचा बघून मुखडा हसरा हो हसरा..
ननन्ना... ।। धृ ।।
छबीदार सुंदरी नटी, उभी एकटी, हळदीचा रंग
चवदार कवळी काकडी, दिसे फाकडी, चवळीची शेंग
कमरेत जरा...
कमरेत जरा बारीक, जशी खारीक, गोडवा न्यारा हा न्यारा
ननन्ना... ।। १ ।।
डोळ्यात शराबी नशा...
डोळ्यात शराबी नशा, गालावर उषा, तोंडलं ओठी
चपळाक हरणीची गती..
चपळाक हरणीची गती, नार गुणवती, सांडलं मोती
ही गोड पेरूची फोड
ही गोड पेरूची फोड, लावते वेड, प्रीतीचा वारा
सारं शिवार गातय गाणं, तिचा बघून मुखडा हसरा हो हसरा..
ननन्ना... ।। २ ।।

Dil Mera - Marathi Song With Lyrics - Aga Bai Arechyaa 2 - Marathi Movie - Sonali Kulkarni, Kedar Shinde



आभाळ आले भरुनी.. शोधू कसे मी कुणाला..
लाटेत वाहून गेला..सगळाच माझा किनारा
हातातला हात तो.. निसटून गेला का असा..
दिल मेरा… दिल मेरा.. खाली खाली सुना..
दर्द हा.. दर्द हा.. आहे नवा पण जुना…
रे मना.. रे मना..

आता एकट्या वाटेवरली.. एक एकटी राह मेरी
धुके दाटले.. हरवल्या दिशा या.. मनात फिरभी याद तेरी
हे.. नशिबाचे डावपेच हाती ना कुणाच्या
वाटे उजाडले आणि अन्धारुनी येई पुन्हा
दिल मेरा.. दिल मेरा.. खाली खाली सुना..
दर्द हा.. दर्द हा.. आहे नवा पण जुना…
रे मना.. रे मना..

Mann Suddha Tujha - Marathi Song With Lyrics - Ajay Gogawale - Double Seat - Ankush Chaudhari, Mukta Barve


मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची

झेंडा भल्या कामाचा जो घेउनि निघाला
काटंकुटं वाटंमंदी बोचति त्येला
रगत निगंल, तरि बि हंसल, शाबास त्येची
मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथिविमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीति कशाची
पर्वा बी कुनाची

जो वळखितसे औक्ष म्हंजी मोटि लडाई
अन्‌ हत्याराचं फुलावानी घाव बि खाई
गळ्यामंदी पडंल त्येच्या माळ इजयाची

Kiti Sangaychay Mala - Double Seat - Marathi Song With Lyrics - Ankush Chaudhari, Mukta Barve



किती सांगायचय......
किती सांगायचय मला किती सांगायचय
कोरडया जगात माझ्या,
भोवती चार भिंती
बोचरे नकार सारे
आशा क्षणात विरती
बेचैन स्वप्नांची अन पाखरे हरून जाती
मनाच्या पाऱ्याला  आवरू किती

किती सांगायचय मला ......किती सांगायचय
किती सांगायचय मला तुला .... किती सांगायचय.......४

मनाच्या पाऱ्याला असे  स्वप्नांचे बहर
मनाच्या  आभाळी अशी ओले ती लहर
मनाच्या या गावी असे दोघांचेच घर
घेऊदे मनाला श्वास मोकळा
किती सांगायचय मला ......किती सांगायचय
किती सांगायचय मला तुला .... किती सांगायचय






Mohini Mumbaichi Lavani - Song with Lyrics - Double Seat - Mukta Barve, Ankush Chaudhari



Sunday, August 23, 2015

Rang He Nave Nave - Marathi Song With Lyrics | Coffee Ani Barach Kahi - Marathi Movie | Sasha Tirupathi


रंग हे नवे नवे, दुनिया है नयी नयी
Mornings are just magical,
शामें भी हैं सुरमई..

दिल में जैसे तितलियों के
सैंकड़ों हैं पर लगे
हंसते हंसते ख़्वाब से जैसे कोई जगे
गाठ जाई बांधली
तरी कुठे दिेसे न दोर,
This is not only a crush,
I guess it's something more...
ख़्वाबों में भी, ख़यालों में भी
एकटी असे न मी, असेच तोही सोबती

पहिले कधी ही ना,
मी अशी वेडी-भोलीभाली फ़ॅन्टसी
जगलेच नव्हते कधी,
अब तो जब दिन ढलता है
ना पता कैसे कब,
सिंड्रेला बनून जाते मी माझी,
आते-जाते देख के वो दिल चुरा के ले गया
चोर इतका आपला न वाटला कधी,
सौ तरह के रंग मेरे, सौ तरह के मूड हैं
आजसारखी अधीर ना तरी कधी
ख़्वाबों में भी, ख़यालों में भी
एकटी असे न मी, असेच तोही सोबती

रंग हे नवे नवे, दुनिया है नयी नयी
Mornings are just magical,
शामें भी हैं सुरमई..

दिल में जैसे तितलियों के
सैंकड़ों हैं पर लगे
हंसते हंसते ख़्वाब से जैसे कोई जगे
गाठ जाई बांधली
तरी कुठे दिेसे न दोर,
This is not only a crush,
I guess it's something more...
ख़्वाबों में भी, ख़यालों में भी
एकटी असे न मी, असेच तोही सोबती

Friday, August 21, 2015

Sobane Soyanire | Carry On Maratha | Gashmeer Mahajani & Kashmira Kulkarni


सोबाने  सोयान्निरे......
व्याकूळ  का  होई  मंन  जरा  हे
सारे  आधार  कोसळती
उसवुनी  कारे  फसवुनी गेली 
भेट  ती  ओझरती 
साऱ्या  भितुर  आठवणी  होऊनीया 
आज  वळीव   पाझरती ...

सुना ... तुझ्या विना 
रिता   इथे मी  हूर  तो
सरताना ... हा  पुन्हा ...
दिस  मला  हि सलतो
आभास  हा  कि  श्वास   कुणाचे 
हलकेच  कुजबुजले
व्याकूळ  का  होई  मंन  जरा  हे
सारे  आधार  कोसळती
सोबाने सोयान्निरे    ........

कुठून  अवचित अनोळखी  शी
ओळख  हि  हळवी ...
चाहूल  अजूनी  दे  मला  च्या  पायरीशी  फसवी
सारे  हे  पहारे....  एकदा  तोडून  ये
जग  सारे .... बावरे
तुज  हे  सोडून  ये....
भास  जरासा  इथे  कोणाची  सावली  दरवळते ...

(तुफान  माझे  सावरण्याला
झुळूक  होऊन   ये ) – २
उदान  ला  हा  जीव  जरासा
तोडे  किनारे  आज   ते
आज  सावरू  आवरू  कसे  मी  मला
क्षण  सारे  हूर  हूर  ते
सोबाने सोयान्निरे ..........
सुना   ... तुझ्या   विना 
रिता इथे मी  हूर  तो
सरताना ... हा  पुन्हा ...
दिस  मला  हि सलतो
ऒ .. सनईचे  सूर
उरात  का  हूर 
मंन माझे  अडखळते
व्याकूळ  का  होई  मंन  जरा  हे
सारे  आधार  कोसळती
उसवुनी  कारे  फसवुनी   गेली 
भेट  ती  ओझरती
साऱ्या  भितुर  आठवणी  होऊनी
आज  वळीव   पाझरती ...
सोबाने सोयान्निरे    ........

Adhir Man Zhale-Marathi Song With Lyrics- Nilkanth Master


अधिर मन झाले ....मधुर घन आले...
धुक्यातुनी.....नभातले....
सख्या.....प्रिया...
सरीतूनी ....सुरेल धुंद स्वर हे आले... 
अधिर मन झाले.....
धुक्यातुनी ....नभातले...
सख्या.... प्रिया...
सरीतूनी ....सुरेल धुंद स्वर हे आले...
मधुर घन आले .......

मी अशा रंगाची ....मोतिया अंगाची...
केवड्या गंधाची.....बहरले ना...
उमगले रानाला..... देठाला पानाला...
माझ्या सरदाराला.... समजले ना...
आला रे.... काळजा घाला रे....
झेलला भाला रे..... गगन भारी झाले रे...
अधिर मन झाले.... मधुर घन आले...
धुक्यातुनी ....नभातले ....
सख्या .....प्रिया....
सरीतूनी ....सुरेल धुंद स्वर हे आले...
मधुर घन आले .....

सोसला वारा मी ....झेलल्या धारा मी....
प्यायला पारा मी.... बहकले ना ...
गावच्या पोरांनी .....रानाच्या मोरांनी....
शिवारी साऱ्यांनी...... पहिले ना...
उठली रे .....हुल ही उठली रे....
चाल रीत सुटली रे .....निलाजरी झाले रे....
अधिर मन ....मधुर घन...
धुक्यातुनी... नभातले...
सख्या ....प्रिया....
सरीतूनी....सुरेल धुंद स्वर हे.....

Gulabachi Kali - Marathi Song - Tu Hi Re - Swwapnil Joshi, Sai Tamhankar, Tejaswini Pandit


गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
नटून थटून लाजते जनू चांदनी
नटून थटून लाजते जनू चांदनी
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली…
कुणासाठी कुठे, कशी, कधी कधी कळेना
कुणासाठी कुठे, कशी, कधी कधी कळेना
कुण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कुण हलकेच तार काळजाची छेडतो
कधीकधी कधीकधी,कधीकधी देतो कुणी नजरेचा इशारा
कुणी हरपून देह भान त्यात गुंतातो
कुणी हरपून देह भान त्यात गुंतातो
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली…।। १ ।।
चढते भिडते जादू नजरेची अशी
चढते भिडते जादू नजरेची अशी
नकळत वेड बावऱ्या जीवाला लावते
मन विसरून वाट सैरवैर धावते
अरे गुलाबाची कली कशी हलदीनं माखली
आली आली लाली लाली उतू उतू चालली…
कुणासाठी कुठे, कशी, कधी कधी कळेना
कुण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कधीकधी कधीकधी,कधीकधी देतो कुणी नजरेचा इशारा
कुणी हरपून देह भान त्यात गुंतातो
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
नटून थटून लाजते जनू चांदनी
नटून थटून लाजते जनू चांदनी
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली… ।। २ ।।