Showing posts with label sai tamhankar. Show all posts
Showing posts with label sai tamhankar. Show all posts

Monday, August 24, 2015

Sundara | Marathi Song With Lyrics | Tu Hi Re | Adarsh Shinde | Swwapnil, Sai Tamhankar, Tejaswini Pandit


जलपरी फार लाजरी, प्रीतबावरी, लाविते छंद
भरजरी शालू अंजीरी, मदन मंजिरी, फिरे स्वच्छंद
रतीरूप अजिंठा शिल्प, कोरिले कुणी, उभी सत्कारा...
हे सुंदरा
को.-
गजगजीत कोवळी काया की बाभळ तरणी ताठी
तू नटून थटून येता, उठतात वादळे मोठी
नजरेचे मारुनी तीर, कैकास करी घायाळ
तू पोर द्वाड मुलखाची, लई अवखळ धीट खट्याळ
सुंदरा असावी कशी..
सुंदरा असावी कशी, अप्सरा जशी, वेणीमधे गजरा
सारं शिवार गातय गाणं, तिचा बघून मुखडा हसरा हो हसरा..
ननन्ना... ।। धृ ।।
छबीदार सुंदरी नटी, उभी एकटी, हळदीचा रंग
चवदार कवळी काकडी, दिसे फाकडी, चवळीची शेंग
कमरेत जरा...
कमरेत जरा बारीक, जशी खारीक, गोडवा न्यारा हा न्यारा
ननन्ना... ।। १ ।।
डोळ्यात शराबी नशा...
डोळ्यात शराबी नशा, गालावर उषा, तोंडलं ओठी
चपळाक हरणीची गती..
चपळाक हरणीची गती, नार गुणवती, सांडलं मोती
ही गोड पेरूची फोड
ही गोड पेरूची फोड, लावते वेड, प्रीतीचा वारा
सारं शिवार गातय गाणं, तिचा बघून मुखडा हसरा हो हसरा..
ननन्ना... ।। २ ।।

Friday, August 21, 2015

Gulabachi Kali - Marathi Song - Tu Hi Re - Swwapnil Joshi, Sai Tamhankar, Tejaswini Pandit


गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
नटून थटून लाजते जनू चांदनी
नटून थटून लाजते जनू चांदनी
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली…
कुणासाठी कुठे, कशी, कधी कधी कळेना
कुणासाठी कुठे, कशी, कधी कधी कळेना
कुण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कुण हलकेच तार काळजाची छेडतो
कधीकधी कधीकधी,कधीकधी देतो कुणी नजरेचा इशारा
कुणी हरपून देह भान त्यात गुंतातो
कुणी हरपून देह भान त्यात गुंतातो
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली…।। १ ।।
चढते भिडते जादू नजरेची अशी
चढते भिडते जादू नजरेची अशी
नकळत वेड बावऱ्या जीवाला लावते
मन विसरून वाट सैरवैर धावते
अरे गुलाबाची कली कशी हलदीनं माखली
आली आली लाली लाली उतू उतू चालली…
कुणासाठी कुठे, कशी, कधी कधी कळेना
कुण हळुवार गाठ रेशमाची बांधतो
कधीकधी कधीकधी,कधीकधी देतो कुणी नजरेचा इशारा
कुणी हरपून देह भान त्यात गुंतातो
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली
नटून थटून लाजते जनू चांदनी
नटून थटून लाजते जनू चांदनी
गुलाबाची कली बघा हलदीनं माखली
आली लाली गोऱ्या गाली उतू उतू चालली… ।। २ ।।

Saturday, March 14, 2015

Ye Naa Gade Official Video | Hunterrr | Gulshan Devaiah, Radhika Apte & Sai Tamhankar,Marathi song



नौवारी   साडी  माझी  गुलाबी
सापडेना  कुठ मी ठेवली
नौवारी   साडी  माझी  गुलाबी
सापडेना  कुठ मी ठेवली
सर्जा रावांनी  sms केला
बीगी  बीगी  येणा  गडे farm housela
Sms पाहून  बुलूप   माझा  पेटला
आशी  कशी  जाऊ  मी  फार्म  house  ला

ये  ये  ये  ये  येना

ये  ये  येना  येना गडे
देतो  मी  गुलाबी  साडी  ग
ये  ये  येना  येना गडे
देतो  मी  matching  चोळी  ग

ये  ये  येना  येना गडे
देतो  मी  गुलाबी  साडी  ग
ये  ये  येना  येना गडे
देतो  मी  matching  चोळी  ग

बोलवून  धोक्यांनी
केली  मला  लाडी गुडी
रावांच्या  मिठीत
सळसळते  माझी  बोद्य

माप  घेणार  तुझा  A1 शिप्यावानी
अग  ज्वानीची हि  मजा
घेऊ  English picture वाणी

थांबा  हो  रावजी
स्टेप बाय स्टेप जाऊ जरा
हे लग्नाच licence काढू
मग हव तसा driving  करा


ये  ये  येना  येना गडे
देतो  मी  गुलाबी  साडी  ग
ये  ये  येना  येना गडे
देतो  मी  matching  चोळी  ग

ये  ये  येना  येना गडे
देतो  मी  गुलाबी  साडी  ग
ये  ये  येना  येना गडे
देतो  मी  matching  चोळी  ग

Jeep गाडीत  नेताना टेम्पोत जाताना
तुमचाच  होर्डिंग दिसतो मला
माझ्या  पैकीच  चमी बोलते
तुमच्या  डोक्यात काय  काय  चालते
खर  खर  आईशपथ  सांगा  मला  (X2)

Ok तू  जायेगी  शपथ घेतो
प्रेम  हाय  माझा  खरा
Makeup करून  झ्याक म्याक बनून
बिगी बिगी  घरा  बाहेर  पडा

ये  ये  येना
देतो  मी  गुलाबी  साडी  ग
ये  ये  येना
देतो  मी  matching  चोळी  ग

ये  ये  येना  वाड्यावर
देतो  मी  गुलाबी  साडी  ग
ये  ये  येना  वाड्यावर
देतो  मी  matching  चोळी  ग

बिगी बिगी आले वाड्यावर
नेसून  गुलाबी  साडी  ग
बिगी बिगी आले वाड्यावर
नेसून  गुलाबी  साडी  ग

ये  ये  ये  ये
ये  ये  ये  ये