मिटुनी लोचने घे भिरभिरती
सूर नांदीचे बघ दरवळती
लाल चुटुक मखमली आता अलगद हि उमलेल
भरुनी अवकाशच अवघा खेळ नवा रंगेल..
नवीन नांदी नवी संहिता
हवीहवीशी नवी भुमिका
पात्र होऊनी विरघळताना
गात्र गात्र बहरेल
भरुनी अवकाशच अवघा खेळ नवा रंगेल..
प्रवेश सरला अंक बदलला
अंधारातच मंच मिळाला
पुन्हा तुझ्यास्तव याच
तमातून नवा मंच उजळेल
No comments:
Post a Comment