हासताच चांदणी , लाजताच मोहिनी ..
पाहताच कामिनी , काळजाची स्वामिनी ..
सिंपल सिंपल सिंपल हवी ,
सिंपल मध्ये डिंपल हवी ........(2)
अंग अंग निखारा आणि रान रान शहारा
श्वास श्वासात भिनला , प्रीतीचा फुलला पिसारा ..
एकांत हा जीव घे ना , तू आणखी जवळ ये ना ..
हुंकार भरतील दिशा ही , जेव्हा माझी होईल रुपाली ..
रूपा... ली .. ई....
सिंपल सिंपल सिंपल हवी ,
सिंपल मध्ये डिंपल हवी .........(2)
मानेवरचा तिळ मी शोधावा रोज रात्री ,
ओठावारली साय ती मिटावी आच ओठी ..
देहात मी गुरफटावे , स्पर्शात तल्लीन ह्वावे ...
मन तृप्त होईल सुखांनी , जेव्हा माझी होईल रुपाली ...
रूपा..ली..ई ....
सिंपल सिंपल सिंपल हवी ,
सिंपल मध्ये डिंपल हवी .........(2)
No comments:
Post a Comment