Showing posts with label Jitendra Joshi. Show all posts
Showing posts with label Jitendra Joshi. Show all posts

Monday, February 1, 2016

Simple Simple - Poshter Girl | New Marathi Songs 2016 | Sonalee Kulkarni


हासताच चांदणी , लाजताच मोहिनी ..
पाहताच  कामिनी , काळजाची  स्वामिनी ..

सिंपल  सिंपल  सिंपल  हवी ,
सिंपल  मध्ये  डिंपल   हवी ........(2)

अंग  अंग  निखारा  आणि  रान  रान  शहारा
श्वास  श्वासात   भिनला , प्रीतीचा  फुलला  पिसारा ..
एकांत  हा  जीव  घे  ना , तू  आणखी  जवळ  ये  ना ..
हुंकार   भरतील  दिशा  ही , जेव्हा  माझी  होईल  रुपाली ..
रूपा... ली .. ई....

सिंपल  सिंपल  सिंपल हवी ,
सिंपल मध्ये  डिंपल  हवी .........(2)

मानेवरचा   तिळ  मी  शोधावा  रोज  रात्री ,
ओठावारली  साय  ती मिटावी   आच ओठी ..
देहात  मी  गुरफटावे , स्पर्शात  तल्लीन  ह्वावे ...
मन  तृप्त  होईल  सुखांनी , जेव्हा  माझी  होईल  रुपाली ...
रूपा..ली..ई ....

सिंपल  सिंपल  सिंपल  हवी ,
सिंपल  मध्ये  डिंपल  हवी .........(2)

Wednesday, May 21, 2014

Pari Mhanu Ki Sundara - Avdhoot Gupte's Superhit Song - Golmaal - Amruta Khanvilkar, Jitendra Joshi

 
परी म्हणू की सुंदरा तिची तर्‍हा असे जरा निराळी......२
तिची अदा करी फिदा ही मेनका कुणी जणु निघाली.......२

तिचे वळून पाहणे, मधाळ गोड बोलणे......२
कधी खट्याळ हासुनी हळूच जीभ चावणे.......२
मोकळा करुन मीच हे कधीच दिल तिच्या हवाली
तिची अदा करी फिदा ही मेनका कुणी जणु निघाली
परी म्हणू की सुंदरा तिची तर्‍हा असे जरा निराळी 
तिची अदा करी फिदा ही मेनका कुणी जणु निघाली
 
हजारदा ती भेटते, बोलुबोलु वाटते......२
बोलणे मनातले परि मनीच राहते ......२
मोहिनी तिची अशी फुले जशी हजार भोवताली
तिची अदा करी फिदा ही मेनका कुणी जणु निघाली.
परी म्हणू की सुंदरा तिची तर्‍हा असे जरा निराळी......२
तिची अदा करी फिदा ही मेनका कुणी जणु निघाली.......२