घेवून येशी कोवळे ऋतु सुगंधी सात हे
नवीन भाषा कोणती नजर काही बोलते
साऱ्या सरी या माझ्याचपाशी चिंब तू होईना
माझिया प्रियाला प्रीत कळेना......
जागून तारे मोजत आहे
तुझ्यात मीही रुजतो आहे
कधी तुला ग कळेल सारे
खेळ आहे जुना
माझिया प्रियाला प्रीत कळेना......
तुझी नी माझी भेट ती
क्षणोक्षणी का आठवे
आधी कधी ना वाटले
काहीतरी होते नवे
सांगू कशा मी तुला सख्यारे माझ्या या भावना
माझिया प्रियाला प्रीत कळेना.....
नवीन तारे चंद्र नवा हा
नवीन आहे ऋतु हवासा
अनोळखी हा बहर घेऊन पुन्हा पुन्हा भेटना
माझिया प्रियाला प्रीत कळेना........
LAI BHARI
ReplyDelete