Showing posts with label Mitwaa - Title Song by Shankar Mahadevan - Marathi song with lyrics - Swapnil Joshi. Show all posts
Showing posts with label Mitwaa - Title Song by Shankar Mahadevan - Marathi song with lyrics - Swapnil Joshi. Show all posts

Monday, April 27, 2015

Mitwaa - Marathi song with lyrics - Swapnil Joshi, Sonalee Kulkarni

वेड्या मना सांग ना खुणावती  का  खुणा
माझे मला आले हसू प्रेमात फसणे नाही रे
वेड्या मना सांग ना व्हावे खुळी का पुन्हा
तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसणे नाही रे

धुक्यात जसे चांदणे मुक्याने  तसे बोलणे
हो ......सुटतील केव्हा उखाणे
नात्याला काही नाव नसावे तू हि रे माझा मितवा
नात्याचे काही बंधन  नव्हावे तू हि रे माझा मितवा.............२

झुला  भावनांचा उंच उंच न्यावा
स्वतःशी जपावा तरी तोल जावा
सुखाच्या सरींचा ऋतू वेगळा रे
भिजल्यावरी त्यास  का उरे मागे 
फितूर मन बावरे आतुर क्षण सावरे
हो ......स्वप्ना  प्रमाणे पण खरे
नात्याला काही नाव नसावे तू हि रे माझा मितवा........
नात्याचे काही बंधन  नव्हावे  तू हि रे माझा मितवा.............२

वेड पांघरावे न व्हावे शहाणे
ठेच लागण्याचे कशाला बहाणे
हूर हूर वाढे गोड अंतरी हि
पास पास दोघांत अंतर तरी
चुकून  कळले जसे कळून चुकले तसे
हो..... उन सावलीचे खेळ हे 
नात्याला काही नाव नसावे तू हि रे माझा मितवा........
नात्याचे काही बंधन  नव्हावे  तू हि रे माझा मितवा.............२