Showing posts with label Sonalee Kulkarni. Show all posts
Showing posts with label Sonalee Kulkarni. Show all posts

Monday, April 27, 2015

Mitwaa - Marathi song with lyrics - Swapnil Joshi, Sonalee Kulkarni


वेड्या मना सांग ना खुणावती  का  खुणा
माझे मला आले हसू प्रेमात फसणे नाही रे
वेड्या मना सांग ना व्हावे खुळी का पुन्हा
तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसणे नाही रे

धुक्यात जसे चांदणे मुक्याने  तसे बोलणे
हो ......सुटतील केव्हा उखाणे
नात्याला काही नाव नसावे तू हि रे माझा मितवा
नात्याचे काही बंधन  नव्हावे तू हि रे माझा मितवा.............२

झुला  भावनांचा उंच उंच न्यावा
स्वतःशी जपावा तरी तोल जावा
सुखाच्या सरींचा ऋतू वेगळा रे
भिजल्यावरी त्यास  का उरे मागे 
फितूर मन बावरे आतुर क्षण सावरे
हो ......स्वप्ना  प्रमाणे पण खरे
नात्याला काही नाव नसावे तू हि रे माझा मितवा........
नात्याचे काही बंधन  नव्हावे  तू हि रे माझा मितवा.............२

वेड पांघरावे न व्हावे शहाणे
ठेच लागण्याचे कशाला बहाणे
हूर हूर वाढे गोड अंतरी हि
पास पास दोघांत अंतर तरी
चुकून  कळले जसे कळून चुकले तसे
हो..... उन सावलीचे खेळ हे 
नात्याला काही नाव नसावे तू हि रे माझा मितवा........
नात्याचे काही बंधन  नव्हावे  तू हि रे माझा मितवा.............२



Sunday, March 15, 2015

Madanike Marathi Song - Zapatlela 2

  (चटक लावून  येड्या  जीवाला  
कशाला  घालतेस  कुलूप  ओठाला ) – २ 
उनाड लई  बघ  काळीज  माझं  
उरात  वाजतो  ढोल  ढोल  ढोल  ढोल …
मदनिके  – ३  ये  मदनिके 
घडीभर  थांबून  बोल 
(ये  मदनिके 
घडीभर  थांबून  बोल  ) – ३ 

(काय  तुझ्या  मनात 
आलं  माझ्या कानात 
जिथं  तिथे  तुझी   र  घाई  घाई  घाई  
पोरी  तुझ्या    रुपान 
उठल्या  तुफान  रात  रात   झोप  मला  नाय नाय नाय  ) – २ 
(नको  उतावळा  हो  होऊ  जरा  धीरान  घे 
नको  मधाळ  बोलून  टाळू   आता  मिठीत  ये ..हो ) – २ 
पिसाट्लाय  जीव  उधळला  त्याचा 
सुटाया  लागला  तॊल 
मदनिके  – ३  ये  मदनिके 
घडीभर  थांबून  बोल 
(ये  मदनिके 
घडीभर  थांबून  बोल  ) – ३ 

(वाट  तुझी  बघून  जीव  गेला  विटून 
जाऊ  चल  निघून  लांब  लांब  लांब  लांब 
लाज  भीड  सोडून  रीत  भात   मोडून 
घालू  नको  पिंगा  तू  थांब  थांब  थंब  ) – 2
(नको  फिकीर  जगाची  राणी  एक  इशारा  दे 
उगा  बोभाटा    होईल  राजा  जरा  दमन  घे ) -२ 
झाकू  नको  बूज  मनातलं  जर 
ओठांची  मोहोर  खोल 
मदनिके  – ३  ये  मदनिके 
घडीभर  थांबून  बोल 
ये  मदनिके 
घडीभर  थांबून  बोल  
न  न  न  न  न  न ….
(मदनिके 
घडीभर  थांबून  बोल  ) - ८

Saturday, March 14, 2015

Saavar Re Mana Marathi Song | Mitwaa | Swapnil Joshi & Sonalee Kulkarni | Marathi Movie

       
 
सावल्या फुलांच्या, पावले ही फुलांची 
वाट हळवी वेचताना, सावर रे ए मना, सावर रे सावर रे 
सावर रे एकदा, सावर रे 
सावळ्या क्षणांचे, भरून आल्या घनांचे 
थेंब ओले झेलताना, सावर रे ए मना, सावर रे सावर रे 
सावर रे एकदा, सावर रे

भान उरले ना जगाचे ना स्वतःचे 
सोहळे हे जाणीवांचे नेणीवांचे 
फितूर झाले रातदिन तू सावर रे 
सावर रे ए मना, सावर रे सावर रे 
सावर रे एकदा, सावर रे

मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे 
पायऱ्या थोड्या सुखाच्या अन अबोली अंतरे 
येतील आता आपुले ऋतू 
बघ स्वप्न हेच खरे 
पालवीच्या सणांचे, दिवस हे चांदण्यांचे 
पानगळ ही सोसताना, सावर रे ए मना, सावर रे सावर रे
सावर रे एकदा, सावर रे

स्पर्श होता आत लाखो आर्जवांची झुंबरे 
स्वप्न हे माझे तुझे अन पापण्यांचे उंबरे 
जाईल आता आस ही उतू बघ रातही सरे 
पावसाच्या खुणांचे, दिवस हे पैंजणांचे 
मी हवेतून चालताना, सावर रे ए मना , सावर रे सावर रे 
सावर रे एकदा, सावर रे

बहरताना बावरले, सुख जरासे आवरले
तोल माझा खोल जाई, सावर रे