Showing posts with label mumbai pune mumbai. Show all posts
Showing posts with label mumbai pune mumbai. Show all posts

Friday, July 22, 2011

ka kalena kontya kshani





का  कळेना  कोणत्या  क्षणी  हरवते  मन  कसे
उमलती  कशा  धुंद  भावना अल्लड  वाटे कसे
बंध  जुळती  हे  प्रीतीचे गोड  नाते  हे  जन्मातरीचे


एक  मी  एक  तू ,शब्द  मी  गीत  तू
आकाश  तू  आभास  तू  सारयात  तू
ध्यास  मी  श्वास  तू , स्पर्श  मी  मोहर  तू
स्वप्नात  तू  सत्यात  तू साऱ्यात  तू 

का  कळेना  कोणत्या  क्षणी  हरवते  मन  कसे
उमलती  कशा  धुंद  भावना अल्लड  वाटे कसे
बंध  जुळती  हे  प्रीतीचे गोड  नाते  हे  जन्मातरीचे


घडले  कसे  कधी कळते  न जे  कधी 

हळुवार  ते  आले  कसे  ओठावरी 

देणा तू साथ दे हातात  हात  दे 

नजरेतला नजरेतुनी इकरार दे 

का  कळेना  कोणत्या  क्षणी  हरवते  मन  कसे
उमलती  कशा  धुंद  भावना अल्लड  वाटे कसे
बंध  जुळती  हे  प्रीतीचे गोड  नाते  हे  जन्मातरीचे


Ka kalena konatya kshani
Singers- Bela Shende, Swapnil Bandodkar
Music- Avinash-Vishwajeet

kadhi tu - mumbai pune mumbai





कधी तू रिम झिम झरनारी बरसात 
कधी तू चमचम करणारी चांदण्यात
कधी  तू  ओसळत्या  धारा  थैमान  वारा 
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या  लाटा  भिजलेल्या  वाटा
चिंब  पावसाची  ओली  रात


कधी तू रिम झिम झरनारी बरसात 
कधी तू चमचम करणारी चांदण्यात 


कधी  तू  अंग  अंग  मोहरनारी
आसमंत  दरवळणारी  रातराणी  वेड्या  जंगलात (2)
कधी  तू  हिरव्या  चाफ्याच्या  पाकळ्यात
कधी तू रिम झिम झरनारी बरसात

कधी  तू  ओसळत्या  धारा  थैमान  वारा 
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या  लाटा  भिजलेल्या  वाटा
चिंब  पावसाची  ओली  रात


कधी तू रिम झिम झरनारी बरसात 
कधी तू चमचम करणारी चांदण्यात


जरी  तू  कळले तरी  ना  कळणारी
दिसले  तरी  ना  दिसणारी  विरणारे  मृगजळ  एक  क्षणात ...(2)
कधी  तू  मिटलेल्या  माझ्या  पापण्यात
कधी तू रिम झिम झरनारी बरसात


कधी  तू  ओसळत्या  धारा  थैमान  वारा 
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या  लाटा  भिजलेल्या  वाटा
चिंब  पावसाची  ओली  रात


कधी तू रिम झिम झरनारी बरसात 
कधी तू चमचम करणारी चांदण्यात