Showing posts with label suresh wadkar. Show all posts
Showing posts with label suresh wadkar. Show all posts

Sunday, March 18, 2012

Gandh Phulancha gela sangun


 
गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन... व्हावे मिलन
 
गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन... व्हावे मिलन 
गंध फुलांचा गेला सांगून

सहज एकदा जाता जाता
मिळूनी हसल्या अपुल्या नजरा
दो हृदयांच्या रेशीमगाठी
प्रीत भावना गेली बांधून.. गेली बांधून
व्हावे मिलन...  
 

गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन... व्हावे मिलन 
 

विरह संपता मिलनाची
अमृतगोडी चाखीत असता
सखया अवचित जवळी येता
ढळे पापणी, गेले लाजून.. गेले लाजून
व्हावे मिलन...  
 
गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन... व्हावे मिलन 
 
मनामनांच्या हर्षकळयांची
आज गुलाबी फुले जाहली
वरमाला ही त्याच फुलांची
गुंफून सखया तुलाच वाहीन.. तुलाच वाहीन
 
गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन... व्हावे मिलन ||2|| 


Movie: Bhalu
Singers: Asha Bhosale, Suresh Wadkar
Music: Vishwanath More

Gandha Phulancha Gela sangun
Tuze ni maze vhave milan, vhave milan

Thursday, March 8, 2012

pahile na mi tula - gupchup ghupchup




पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले || ध्रु ||

हिमवर्षावातही कांती तव पाहूनी             X  2
तारका नभातल्या लाजल्या मनातुनी
ओघळले हिम तुषार गालावर थांबले       X  2
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले || १ ||

मृदु शय्या टोचते स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रूप देखणे बघून नयन हे सुखावले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले || २ ||   पाहिले न मी तुला ....


हो हो    ला ला ला ला ला      ला ला ला

का उगाच झाकिशी नयन तुझे साजणी       X  2
सांगतो गुपित गोष्ट स्पर्ष तुझा चंदनी
धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले        X  2
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले || ३ ||   पाहिले न मी तुला ....


मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी          X  2

पहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रूप देखणे बघून नयन हे सुखावले           X  2

ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले  || ४ ||     

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले


Movie : Gupchup Gupchup (1983)
Lyricist : Madhusudan kalelakar
Music Director : Anil – Arun
Singer : Suresh Wadakar
Pahile na mi tula tu mala na pahile
Na kale kadhi kuthe man vede guntale