पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले || ध्रु ||
हिमवर्षावातही कांती तव पाहूनी X 2
तारका नभातल्या लाजल्या मनातुनी
ओघळले हिम तुषार गालावर थांबले X 2
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले || १ ||
मृदु शय्या टोचते स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रूप देखणे बघून नयन हे सुखावले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले || २ || पाहिले न मी तुला ....
हो हो ला ला ला ला ला ला ला ला
का उगाच झाकिशी नयन तुझे साजणी X 2
सांगतो गुपित गोष्ट स्पर्ष तुझा चंदनी
धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले X 2
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले || ३ || पाहिले न मी तुला ....
मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी X 2
पहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रूप देखणे बघून नयन हे सुखावले X 2
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले || ४ ||
पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
Movie : Gupchup Gupchup (1983)
Lyricist : Madhusudan kalelakar
Music Director : Anil – Arun
Singer : Suresh Wadakar
Pahile na mi tula tu mala na pahile
Na kale kadhi kuthe man vede guntale
ati sunder!!!
ReplyDelete