गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन... व्हावे मिलन
गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन... व्हावे मिलन
गंध फुलांचा गेला सांगून
सहज एकदा जाता जाता मिळूनी हसल्या अपुल्या नजरा दो हृदयांच्या रेशीमगाठी प्रीत भावना गेली बांधून.. गेली बांधून
व्हावे मिलन...
गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन... व्हावे मिलन
विरह संपता मिलनाची अमृतगोडी चाखीत असता सखया अवचित जवळी येता ढळे पापणी, गेले लाजून.. गेले लाजून व्हावे मिलन...
गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन... व्हावे मिलन
मनामनांच्या हर्षकळयांची आज गुलाबी फुले जाहली वरमाला ही त्याच फुलांची गुंफून सखया तुलाच वाहीन.. तुलाच वाहीन
गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन... व्हावे मिलन ||2||
Movie: Bhalu
Singers: Asha Bhosale, Suresh Wadkar
Music: Vishwanath More
Gandha Phulancha Gela sangun
Tuze ni maze vhave milan, vhave milan
No comments:
Post a Comment