अशी पाखरे येती....२ आणिक स्मृती ठेवूनी जाती...२
दोन दिसांची रंगतसंगत...२ , दोन दिसांची नाती
अशी पाखरे येती..... ll ध्रु ll
चंद्र कोवळा पहिला वहिला...२ , झाडामागे उभा राहिला,...२
जरा लाजूनी जाय उजळूनी..२ , काळोखाच्या राती
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती...
अशी पाखरे येती... ll १ ll
फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले....२
नव्हते नंतर परि निरंतर...२ , गंधित झाली माती
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती...
अशी पाखरे येती... ll २ ll
हात एक तो हळू थरथरला...२ , पाठीवर मायेने फिरला...२
देवघरातील समयीमधूनी...२ , अजून जळती वाती
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती...
अशी पाखरे येती... ll ३ ll
कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी....२
त्या जुळल्या हृदयांची गाथा...२ , सूर अजुनही गाती
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती...
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत...२ , दोन दिसांची नाती
अशी पाखरे येती..... ll ४ ll
Song : - Ashi Pahkare yeti .....
Singer :- Sudhir Phadake
No comments:
Post a Comment