Tuesday, April 28, 2015

Mala Ved Lagale | Marathi Song With Lyrics |Time Pass (TP)| Ketaki Mategaonkar -Prathamesh Parab


रंगबावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा
कुंदकळ्यांना वेलींना सांगा रे सांगा
हे भास होती कसे, हे नाव ओठी कुणाचे
का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे
मला वेड लागले प्रेमाचे

नादावला, धुंदावला, कधी गुंतला जीव बावरा
नकळे कसा कोणामुळे सूर लागला मनमोकळा
हा भास की तुझी आहे नशा, मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे

जगणे नवे वाटे मला, कुणी भेटले माझे मला
खुलता कळी उमलून, हा मनमोगरा गंधाळला
हा भास की तुझी आहे नशा, मला साद घालती दाही दिशा
मला वेड लागले प्रेमाचे

Monday, April 27, 2015

Dur Dur - Mitwaa Marathi Movie - Sad Song - Swapnil Joshi, Sonalee Kulkarni


पेटलं आभाळ सार पेटला हा प्राण रे
उठला हा जाळ आतून करपल रान रे 
उजळ्तांना जळून गेलो राहील ना भान
डोळ्यातल्या  पाण्याने हि भिजेना तहान  

दूर दूर चालली आज माझी  सावली.........२ 
कशी सांज हि उरी गोठली
उरलो हरलो दुखः झाले  सोबती .............२

काय  मी बोलून गेलो  श्वास माझा थांबला
मी इथे अन तो तिथे हा  खेळ आता संपला
मी स्वतःच्या काळजावर घातलेला  घाव हा
रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा
आपुलाच तो रस्ता जुना.......२  मी एकटा चालू किती
उरलो हरलो दुखः झाले  सोबती .............२

लाभतो सारा  दिलासा  कोणता  केला  गुन्हा
जिंकुनी  हि खेळ सारा हारते मी का पुन्हा
त्रास लाखो भास लाखो कोणते मानू खरे
उरण्या   त्या पावसाचे घाव मनावर का चढे

समजावतो मी या मना..............२
तरी आसवे का वाहती
उरलो   हरलो दुखः झाले  सोबती .............२          

Waou Waou (TP2) - TimePass 2 - Priyadarshan Jadhav, Bhau Kadam - marathi song with lyrics



वाऊ वाऊ वाऊ वाव
वाऊ वाऊ वाऊ वाव

दिल आपला दरया रे सारे आव जाव
पेपर में ऊपर है मेरा नाव गाव
टायगर और टारज़न भी सारे च्याव म्याव
खिल्लर नी डैशिंग है माझे हाव भाव
एरिया मे राव दगडू च नाव
घरीदारी नाक्यावरी धुन बजी जाय रे

वाऊ वाऊ वाऊ वाव
वाऊ वाऊ वाऊ वाव


राज्यवानी हाय गुनी लागिन करीत नहीं पप्पा करील काय गो पप्पा करील काय
समजवूनी  सांगा कुणी पोरगी पसंद नाही अप्पा करील काय गो अप्पा करील काय
चपटी लगाओ टेंशन हटाओ
घरीदारी नाक्यावरी धुन बजी जाय रे

Mazhya Dolyat Kazal- Marathi Song with lyrics - Romantic DJ MIX by AMIT


माझ्या डोळ्यात काजळ
माझ्या केसात गजरा

माझ्या डोळ्यात काजळ लई  गया रे
माझ्या केसात गजरा लई गया रे.............२ 
चोरी चोरी मी आले तुम्हा भेटाया 
पण मन मारू  बीज कोणी लई  गया रे

पायी पैजण  नि बाजूबंद दंडावर 
शुक्रतार्र्यांची बिंदी माथ्यावर
भरी वरची मी  भासे जणू अप्सरा
आओ मैफिल को इंद्रसभा लागी गया रे

माझ्या डोळ्यात काजळ
माझ्या केसात गजरा
माझ्या डोळ्यात काजळ लई  गया रे
माझ्या केसात गजरा लई गया रे.............२
चोरी चोरी मी आले तुम्हा भेटाया 
पण मन मारू  बीज कोणी लई  गया रे

Mitwaa - Marathi song with lyrics - Swapnil Joshi, Sonalee Kulkarni


वेड्या मना सांग ना खुणावती  का  खुणा
माझे मला आले हसू प्रेमात फसणे नाही रे
वेड्या मना सांग ना व्हावे खुळी का पुन्हा
तुझ्या सवे सारे हवे प्रेमात फसणे नाही रे

धुक्यात जसे चांदणे मुक्याने  तसे बोलणे
हो ......सुटतील केव्हा उखाणे
नात्याला काही नाव नसावे तू हि रे माझा मितवा
नात्याचे काही बंधन  नव्हावे तू हि रे माझा मितवा.............२

झुला  भावनांचा उंच उंच न्यावा
स्वतःशी जपावा तरी तोल जावा
सुखाच्या सरींचा ऋतू वेगळा रे
भिजल्यावरी त्यास  का उरे मागे 
फितूर मन बावरे आतुर क्षण सावरे
हो ......स्वप्ना  प्रमाणे पण खरे
नात्याला काही नाव नसावे तू हि रे माझा मितवा........
नात्याचे काही बंधन  नव्हावे  तू हि रे माझा मितवा.............२

वेड पांघरावे न व्हावे शहाणे
ठेच लागण्याचे कशाला बहाणे
हूर हूर वाढे गोड अंतरी हि
पास पास दोघांत अंतर तरी
चुकून  कळले जसे कळून चुकले तसे
हो..... उन सावलीचे खेळ हे 
नात्याला काही नाव नसावे तू हि रे माझा मितवा........
नात्याचे काही बंधन  नव्हावे  तू हि रे माझा मितवा.............२



Saturday, April 25, 2015

Timepass 2 - NEW SONG - Premala !( TP 2 )- Marathi song with lyrics


प्रेमाला.... ओढ आज त्या  कुणाची
रातराणी च्या फुलाची
पाकळी हळू हळू फुलावी
मनीच्या दिशा मोकळ्या  अशा
छेडत कशा  ताल हि नवी
तुझे  प्रेम रे माझ्या मनात
देई  जणू नवी पालवी
प्रेमाला...... ओढ आज त्या कुणाची
रातराणी च्या फुलाची
                                  पाकळी हळू हळू फुलावी  ......................II १ II
अरे ऐकणा तुला सांगते
काज आज मिलनाची मनी वाजते
वाहते  हवा आणि चांदवा
धरतील मनात  आशा आज वाटते
असा हा शहारा मला आज देणा
मिठी हि तुझी रे  दे पुन्हा  एकदा
स्पर्श रंग हे मिळूनी असे
प्रेम चित्र हे कोण रंगवी
गोड गोजिरी  चित्र पाहण्या
साथ रे मला तुझी हि  हवी
प्रेमाला...... ओढ आज त्या  कुणाची
रातराणी च्या फुलाची
                                      पाकळी हळू हळू फुलावी........................II २  II  
अरे ऐकणा मिही  ऐकते
एकतार पावसाळी झंकारते
साज हि मनी   थेंब छेडते
कोण  नवी पुन्हा हि प्रीत पाहते
अवेळी  ढगाला जशी जाग आली
तसा तू समोरी ये पुन्हा एकदा
शोधते तुला प्रीतीच्या वनी
वाट रे  तुझी मेघ दाखवी
सोबती सरि सांज वेळ हि
वाटते मला हि  हवी हवी
प्रेमाला...... ओढ आज त्या  कुणाची
रातराणी च्या फुलाची
                                     पाकळी हळू हळू फुलावी........................II ३ II 
ता  रा रा रा रा रा रा 











Praju -TimePass 2 - Priya Bapat, Priyadarshan Jadhav - marathi song with lyrics

 
किलबिल   ते   गाणे   नवे
भिर  भिर  ते  गुलाबी  थवे
हाय  मी  बावरू  कि  सावरू
माझे   मला  न  काळे
सर  सर  त्या  पानामध्ये
वाऱ्याच्या  कानामध्ये
कोणी  बोलले , मी  ऐकले
वाटे  मनाला  हवे
प्राजू .....प्राजू .....प्राजू ....तू प्राजू

थर  थर  त्या   पाण्यात  या
लहरींच्या  गाण्यातला
समजेल  का  सूर  हा  नवा  कोणता
भिजण्याचा  करती  गुन्हा
रुजयास नेती  पुन्हा
नादावला  जीव  हा  इथे  का  जर
दरवळल्या   दाही  दिशा
श्वासात  भिनली  नशा
हाय  मी  बावरू  कि  सावरू
माझे   मला  न  कळे
प्राजू .....प्राजू .....प्राजू .... मी  प्राजू

Tuesday, April 7, 2015

Tujhe Majhe Ek Naav Song with Lyrics - Honar Sun Mi Hya Gharchi -zee Marathi



Julun Yeti Reshimgathi Title Song -Lyrics in Marathi-Marathi Song



Kevha Tari Pahate-marathi song with lyrics-Asha Bhosale



Anandi anand gade-Marathi Song with lyrics


आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे

वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे
नभांत भरला, दिशांत फिरला, जगात उरला
मोद विहरतो चोहीकडे

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदी ही हसते आहे
खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे
मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले
इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे

वाहती निर्झर मंदगती, डोलती लतिका वृक्षतती
पक्षी मनोहर कुजित रे, कोणाला गातात बरे
कमल विकसले, भर्मर गुंगले, डोलत वदले
इकडे, तिकडे, चोहीकडे, आनंदी आनंद गडे

Aamhi Thakara Thakara Ya Ranachi Pakhar- Marathi song with lyrics


आम्ही ठाकरं ठाकरं या रानाची पाखरं
या जांभऱ्या गर्दीत मांडून इवले घर

या पिकल्या शेतावर, तुझ्या आभाळाचा थर
या डोंगर वस्तीवर भोळ्या संभूची पाखर
त्याच्या पंखात पंखात नांदतोया संसार

आल्या बरसाती घेऊन मेघमल्हाराची धून
त्या झिंगल्या झाडांना बांधले पैंजण
चांदण्या गोंदून धरलीया झालर

Dur Deshi Gela Baba Geli Kamavar Aai -Salil Kulkarni - Sandeep Khare-marathi Song with lyrics


दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही

कसा चिमणासा जीव, कसाबसा रमवला
चार भिंतीत धावून दिसभरं  दमवला
आता पुरे, झोप सोन्या कुणी म्हणतच नाही
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही

कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी
कोणी बोलायाला नाही, कशी व्हावी कट्टी-बट्टी
खेळ ठेवले मांडून परि खेळगडी नाही
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही

दिसे खिडकीमधून जग सारे, दिशा दाही
दार उघडून परि तिथे धावायचे नाही
फार वाटे जावे परि मुठीमध्ये बोट नाही
नीज दाटली डोळ्यांत तरी घरी कुणी नाही