Saturday, March 31, 2012

are manmohana re mohana - bala gau kashi angai






अरे मनमोहना......२
कळली देवा तुला, राधिका रे राधिका..
कळली राधिका रे, कळल्या गोपिका...कळल्या गोपिका 
साधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही        ll ध्रु ll
अरे मनमोहनारे... मोहनारे...मोहना...                                  

कळली देवा तुला, राधिका रे राधिका..राधिका रे राधिका
कळली राधिका रे, कळल्या गोपिका...कळल्या गोपिका 
साधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही
अरे मनमोहनारे... मोहनारे...मोहना....आ                              
  
सात सुरांवर तनमन नाचे, तालावरती मधुबन नाचे      २ 
एक अबोली होठी फुलली ...२  तिच्याकडे नजर तुझी वळली नाही
साधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही
अरे मनमोहनारे... मोहनारे...मोहना.....आ                                                   ll १ ll

धुंद सुगंधी यमुना लहरी, उजळून आली गोकुळ नगरी     २
जीवन माझे अंधाराचे....२  काळी काळी रात कधी टळली नाही 
साधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही
अरे मनमोहनारे... मोहनारे...मोहना....आ                                                    ll २  ll 

उन्हात काया, मनात छाया कशी समजावू वेडी माया      २
युग युग सरले, डोळे भरले...२ आशेची कळी कधी फुलली नाही
साधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही
अरे मनमोहनारे... मोहनारे...मोहना                                                                          ll ३ ll 

कळली देवा तुला, राधिका रे राधिका..राधिका रे राधिका
कळली राधिका रे, कळल्या गोपिका...कळल्या गोपिका 
साधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझी माझी प्रीत कधी जुळली नाही
अरे मनमोहनारे... मोहनारे...मोहना  हा..  हा..  हा..

Song :- Are Man Mohana  
Singar :- Asha Bhosale
Flim :- Bala Gau Kashi Angai

Friday, March 30, 2012

Ashi pakare yeti - sudhir phadke



अशी पाखरे येती....२  आणिक स्मृती ठेवूनी जाती...२
दोन दिसांची रंगतसंगत...२ , दोन दिसांची नाती
अशी पाखरे येती.....                                                                                              ll ध्रु ll

चंद्र कोवळा पहिला वहिला...२  , झाडामागे उभा राहिला,...२
जरा लाजूनी जाय उजळूनी..२ , काळोखाच्या राती
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती...
अशी पाखरे येती...                                                                                                ll १ ll

फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले....२
नव्हते नंतर परि निरंतर...२ , गंधित झाली माती
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती...
अशी पाखरे येती...                                                                                               ll २ ll

हात एक तो हळू थरथरला...२ , पाठीवर मायेने फिरला...२
देवघरातील समयीमधूनी...२ , अजून जळती वाती
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती...
अशी पाखरे येती...                                                                                               ll ३ ll

कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी....२
त्या जुळल्या हृदयांची गाथा...२ , सूर अजुनही गाती
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती...
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत...२ , दोन दिसांची नाती
अशी पाखरे येती.....                                                                                             ll ४ ll                            

Song  : - Ashi Pahkare yeti .....
Singer :- Sudhir Phadake                                                                                              

Sunday, March 18, 2012

Damlelya Babachi hi kahani


कोमेजून  निजलेली  एक  परी  राणी ,
उतरले  तोंड  डोळा  सुटलेले  पाणी  ||2||

ला  ला  ला  ला  , ला ..ला  ला

रोजचेच  आहे  सारे  काही  आज  नाही
माफी  कशी  मागू  पोरी  मला  तोंड  नाही
झोपेतच  घेतो  तुला  आज  मी   कुशीत
निजतच  तरी  पण  येशील  खुशीत
सांगायची  आहे  माझ्या  सानुल्या  फुला
दमलेल्या  बाबाची  हि  कहाणी  तुला
.....
ला ..ला  ला  ला  ला  , ला ..ला  ला  ला  ला.... ||2||

आट-पाट नगरात  गर्दी  होती भारी
घामाघूम  राजा  करी  लोकलची  वारी  ||2||
रोज  सकाळीस  राजा  निघताना  बोले ,
गोष्ट  सांगायचे  काल  राहुनिया  गेले
जमलेच  नाही  काल  येणे  मला  जरी
आज  परी  येणार  मी  वेळेतच  घरी
स्वप्नातल्या  गावा  मध्ये  मारू  मग  फेरी
खरया खुऱ्या परी  साठी  गोष्टीतली  परी
बांधीन  मी  थकलेल्या  हातांचा  झुला
दमलेल्या  बाबाची  हि  कहाणी  तुला ....

ला ..ला  ला  ला  ला  , ला ..ला  ला  ला  ला.... ||2||

ऑफिसात  उशिरा  मी  असतो  बसून     
भंडावले  डोके  गेले  कामात  बुडून          
तास  तास  जातो  खाली   मानेने निघून 
एक  एक  दिवा  जातो  हळूच  विजून      
अशावेळी  काही  सांगू  काय काय वाटे    
आठवा  सोबत  पाणी  डोळ्यातून  दाटे    
वाटते  कि  उठूनिया  तूज पास  यावे       
तुझ्यासाठी  मी  पुन्हा  लहानगे   व्हावे   
उगाचच  रुसावे   नि  भांडावे  तुझाशी      
चिमुकले  खेळ  काही  मांडावे  तुझाशी 





उधळत खिदळत  बोलशील  काही
बघताना  भान  मला  उरणार  नाही  ||2||
हासुनिया  उगाचच  ओरडेल  काही
दुरूनच  आपल्याला  बघणारी  आई
तरी  सुद्धा  दोघे  जन  दंगा  मांडू  असा
क्षणा  क्षणा  वर  ठेवू  २ खोडकर  ठसा
सांगायची  आहे  माझ्या  सानुल्या  फुला
दमलेल्या  बाबाची  हि  कहाणी  तुला .....


ला ..ला  ला  ला  ला , ला ..ला  ला  ला  ला.... ||2||


दमलेल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ-मऊ  दूध  भात  भरवेल  आई  
गोष्ट  ऐकायला    मग  येशील  ना  अशी
सावरीच्या   उशीहून  मऊ  माझी  कुशी



कुशी  माझी  सांगत  आहे  ऐक बाळा  काही
सदोदित  जरी  का  मी  तुझ्या पास  नाही
जेऊ 
खाऊ  न्हाऊ  माखू  घालतो  ना  तुला
आई  परी  वेणी -फनी  करतो  ना  तुला  ||2||
तुझ्यासाठी  आई  परी  बाप पण  खुळा
तरी  हि   कधी  गुप  चूप  रडतो  रे  बाळा
सांगायची  आहे  माझ्या  सानुल्या  फुला
दमलेल्या  बाबाची  हि  कहाणी  तुला ....


ला ..ला  ला  ला  ला  , ला ..ला  ला  ला  ला.... ।।२।।

बोळक्या मध्ये  लुक -लुकलेला  तुझा  पहिला  दात
आणि  पहिल्याधाच  घेतलास  जेव्हा तोंडी  मऊ  भात
आई  म्हणण्याआधी  सुद्धा  म्हणली  होतीस  बाबा
रंगात -रांगत घेतलास  जेव्हा  घराचा  तू  ताबा
लुटू -लुटू  उभा  राहत  टाकलस पाउल  पहिलं
दूरचं पाहत  राहिलो  फक्त , जवळ   पहाईचच राहिलं


असा गेलो  आहे  बाळा  पुरा  अडकून
हल्ली  तुला  झोपेतच  पाहतो  दुरून  ||2||
असा  कसा  बाबा  देव  लेकराला  देतो
लवकर  जातो  आणि  उशिरानी  येतो
बालपण  गेले  तुझे  गुज  निसटून
उरे  काय तुझा  माझा  ओंझळी  मधून
जरी  येते  ओठी  तुझा  माझासाठी  हसे
नजरेत  तुझ्या   काही  अनोळखी  दिसे
तुझ्या   जगातून  बाबा  हरवेल  का  ग ?
मोठेपणी  बाबा  तुला  आठवेल  का  ग ? ||2||
सासुराला  जाता  जाता  उंबरठ्या  मध्ये
बाबासाठी  येईल  का  पाणी  डोळ्यामध्ये ?....



ला ..ला  ला  ला  ला  , ला ..ला  ला  ला  ला.... ।।२।।
ला ..ला  ला  ला  ला  , ला ..ला  ला  ला  ला.... ।।२।।

Gandh Phulancha gela sangun


 
गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन... व्हावे मिलन
 
गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन... व्हावे मिलन 
गंध फुलांचा गेला सांगून

सहज एकदा जाता जाता
मिळूनी हसल्या अपुल्या नजरा
दो हृदयांच्या रेशीमगाठी
प्रीत भावना गेली बांधून.. गेली बांधून
व्हावे मिलन...  
 

गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन... व्हावे मिलन 
 

विरह संपता मिलनाची
अमृतगोडी चाखीत असता
सखया अवचित जवळी येता
ढळे पापणी, गेले लाजून.. गेले लाजून
व्हावे मिलन...  
 
गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन... व्हावे मिलन 
 
मनामनांच्या हर्षकळयांची
आज गुलाबी फुले जाहली
वरमाला ही त्याच फुलांची
गुंफून सखया तुलाच वाहीन.. तुलाच वाहीन
 
गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन... व्हावे मिलन ||2|| 


Movie: Bhalu
Singers: Asha Bhosale, Suresh Wadkar
Music: Vishwanath More

Gandha Phulancha Gela sangun
Tuze ni maze vhave milan, vhave milan

Tuesday, March 13, 2012

Rangat Rang to Shyam Rang




 रंगात  रंग  तो  श्याम  रंग पाहण्या नजर  भिरभिरते
 ऐकून  तान  विसरून  भान  ही  वाट  कुणाची  बघते
 या  सप्तसुरांच्या  लाटेवरूनी साद  ऐकुनी  होई ,
 राधा  ही...  बावरी, हरीची राधा ही बावरी     x 2     || धृ  ||

हिरव्या  हिरव्या झाडांची पिवली पाने  झुलताना
चिंब  चिंब देहावरूनी श्रावंधारा झरताना
हा  दरवलनारा गंध  मातीचा  मनात  बिलगून  जाई, 
हा  उनाड  वारा  गुज  प्रितीचे  कानी  सांगुन जाई,
या सप्तसुरांच्या  लाटेवरूनी साद  ऐकुनी  होई, 
राधा ही...  बावरी,  हरीची राधा ही बावरी     x 2    || 1 ||

आज  इथे  या  तरुतली  सुर  वेनुचे  खुणावती
तुझ  सामोरे  जातांना  उगा  पाउले घुटमलती
हे  स्वप्न  असे  कि  सत्य  म्हणावे  राधा  हरपून जाई,
हा  चंद्र  चांदणे  ढगा आडुनी  प्रेम  तयांचे पाही
या सप्तसुरांच्या  लाटेवरूनी साद  ऐकुनी  होई, 
राधा ही...  बावरी,  हरीची राधा ही बावरी     x 2    || 2 ||

 रंगात  रंग  तो  श्याम  रंग पाहण्या नजर  भिरभिरते
 ऐकून  तान  विसरून  भान  ही  वाट  कुणाची  बघते
 या  सप्तसुरांच्या  लाटेवरूनी साद  ऐकुनी  होई ,
 राधा  ही...  बावरी, हरीची राधा ही बावरी    x 2



Rangat rang to shyam rang
Radha hi bawari
swapnil bandodkar

Thursday, March 8, 2012

airanichya deva tula - sadhi manasa


 
 
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे

लेऊ लेणं गरीबीचं, चनं खाऊ लोखंडाचं   X   2
जीणं होऊ आबरुचं, धनी मातूर माझ्या देवा, वाघावानी
धनी मातूर माझ्या देवा, वाघावानी... असू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे
 

लक्शिमिच्या  हातातली चवरी व्हावी वर खाली   X  2
इडा पीडा जाईल, आली किरपा तुझी भात्यातल्या सूरां संग
किरपा तुझी भात्यातल्या सूरां संग... गाऊ दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे

 
सुख थोडं, दुःख भारी, दुनिया ही भली बुरी
घावं बसंल घावावरी, सोसायाला झुंजायाला, अंगी बळ येऊ दे
 
ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे 

airanichya deva tula thingi thingi vahu de
Movie : Sadhi Manasa

pahile na mi tula - gupchup ghupchup




पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले || ध्रु ||

हिमवर्षावातही कांती तव पाहूनी             X  2
तारका नभातल्या लाजल्या मनातुनी
ओघळले हिम तुषार गालावर थांबले       X  2
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले || १ ||

मृदु शय्या टोचते स्वप्न नवे लोचनी
पाहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रूप देखणे बघून नयन हे सुखावले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले || २ ||   पाहिले न मी तुला ....


हो हो    ला ला ला ला ला      ला ला ला

का उगाच झाकिशी नयन तुझे साजणी       X  2
सांगतो गुपित गोष्ट स्पर्ष तुझा चंदनी
धुंदल्या तुझ्या मिठीत देहभान हरपले        X  2
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले || ३ ||   पाहिले न मी तुला ....


मृदुशय्या टोचते स्वप्न नवे लोचनी          X  2

पहिलेस तू तुला आरशात ज्या क्षणी
रूप देखणे बघून नयन हे सुखावले           X  2

ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले  || ४ ||     

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले


Movie : Gupchup Gupchup (1983)
Lyricist : Madhusudan kalelakar
Music Director : Anil – Arun
Singer : Suresh Wadakar
Pahile na mi tula tu mala na pahile
Na kale kadhi kuthe man vede guntale

Ha chandra Tuzhyasathi- swapnil bandodkar

हा चंद्र तुझ्यासाठी , ही रात तुझ्यासाठी ,
……..हा रास हि तर्र्यांची…. गगनात तुझ्यासाठी!!
हा चंद्र तुझ्यासाठी , ही रात तुझ्यासाठी ,
……..हा रास हि तर्र्यांची…. गगनात तुझ्यासाठी!!
कैभात अश्यावेळी, मज याद तुझी आली……
ये नाआआआआ आ …..
मोहरत्या स्वप्नांना घेहून ये तू ,थरथरत्या स्पर्शाना घेहून ये तू ,
अनुरांनी रसरंगी होऊन ये तू ,नाजुकशी एक परी होऊन ये तू !!!
वर्षाव तुझ्या तारुण्याचा ,रिमझिमता म्हज्यावारी होऊ दे…
रेशीम तुझ्या लावण्याचे, चंदेरी म्हज्यावारी लहरुध्ये…
नाव तुःजे म्हाज्या होटावर येते ..
फूल जसे कि फूलातांना दरवळते..
इतके मज कळते ,अधुरा मी येते …..
चांद रात हि भगुनी सुटून जाते…………
बांधिन गगनास झुला ,जर देशील साथ मला …..
ये नाआआआआ आ …..
मोहरत्या स्वप्नांना घेहून ये तू ,थरथरत्या स्पर्शाना घेहून ये तू ,
अनुरांनी रसरंगी होऊन ये तू ,नाजुकशी एक परी होऊन ये तू !!!
हे क्षन हळवे एकांताचे ,दाटलेले म्हाज्या किती भवताली ,
चाहूल तुझी घेण्यासाठी , रात्र झाली आहे महु म्हकमाल्ली…
आज तुला सारे काही सांगावे …
भिल्गुन्या तू मजला ते यैकावे …
होऊन कारण जे ,उसळे मन म्हाजे …..
पाऊल का आजुनिना तुझे वाझे
जिव म्हाझा व्याकुळला ,दे आता हाक मला ….ये नाआआआआ आ …..
मोहरत्या स्वप्नांना घेहून ये तू ,थरथरत्या स्पर्शाना घेहून ये तू ,
अनुरांनी रसरंगी होऊन ये तू ,नाजुकशी एक परी होऊन ये तू !!!
ha chandr tuzyasathi hi rat tuzyasathi aaras hi taryanchi gagnat tuzyasathi swapnil bandodkar bedhund

Labhale amhas bhagya bolato marathi

 
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी   X  २
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी    X  २
एवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी

(आमुच्या मनामनात दंगते मराठी
आमुच्या रगारगात रंगते मराठी    )  X २

आमुच्या उराउरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
लाभले आम्हास  भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी

बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी


आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाटते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी   X   २

येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी  X   २

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी (मराठी )

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी   २
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी

बोलतो मराठी, ऐकतो मराठी
जाणतो मराठी, मानतो मराठी
दंगते मराठी, रंगते मराठी,
स्पंदते मराठी, गर्जते मराठी
गुंजते मराठी, गर्जते मराठी
गर्जते मराठी गर्जते मराठी



labhale amhas bhagya bolato marathi,
Jahalo kharech dhanya aikato marathi
Marathi abhiman geet
Kaushal inamdar

Dis Char Jhale man




दिस चार झाले मन, पाखरू होऊन            X  2
(पानपान आर्त आणि )  X  2    झड बावरून
दिस चार झाले मन, पाखरू होऊन            X  2

सांजवेळी जेव्हा येई आठव आठव            X  2
दूर कुठे मंदिरात होई घंटारव
उभा अंगावर राही काटा सरसरून

दिस चार झाले मन, पाखरू होऊन            X  2

ला  ला ...   ला  ला  ला  
नकळत आठवणी जसे विसरले              X  २
वाटेवर इथे तसे ठसे उमटले
दूर वेडेपिसे सूर सनईभरून

दिस चार झाले मन, पाखरू होऊन            X  2

झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा          X  2
आता जरी आला इथे ऋतु वसंताचा
ऋतु हा सुखाचा इथला गेला ओसरून

दिस चार झाले मन, पाखरू होऊन            X  2 
(पानपान आर्त आणि )  X  2    झड बावरून
दिस चार झाले मन, पाखरू होऊन            X  2

Dis char zhale mann… o pakharu houn
Song – Dis Char Jhale Man
Movie Aai Shapath…! (2006)
Lyrics Saumitra
Music Ashok Patki
Singer Sadhana Sargam