Wednesday, May 7, 2014

Abhas Ha Marathi song movie Yanda kartavya aahe


कधी दूर दूर, कधी तू समोर, मन हरवते आज का
का हे कसे, होते असे, ही आस लागे जिवा
कसा सावरू मी, आवरू ग मी स्वत:
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला

आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !

क्षणात सारे उधाण वारे, झुळुक होऊन जाती
कधी दूर तूही, जवळ वाटे पण, काहीच नाही हाती

मी अशीच हासते, उगीच लाजते, पुन्हा तुला आठवते
मग मिटून डोळे तुला बाहते तुझ्याचसाठी सजते

तू नसताना असल्याचा खेळ हा
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !

मनात माझ्या हजार शंका, तुला मी जाणू कसा रे
तू असाच आहेस, तसाच नाहीस, आहेस खरा कसा रे

तू इथेच बस न, हळूच हस न, अशीच हवी मला तू
पण माहीत नाही मलाही अजुनी तशीच आहेस का तू

नवे रंग सारे नवी वाटे ही हवा
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला
आभास हा, आभास हा
छळतो तुला, छळतो मला !

No comments:

Post a Comment