वार्यावरती गंध पसरला नाते मनाचे
मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे
जल्लोष आहे आता उधाणलेला
स्वर धुंद झाला मनी छेडलेला
शहारलेल्या, उधाणलेल्या कसे सावरावे !
स्वप्नातले गाव माझ्यापुढे
दिवसाचा पक्षी अलगद उडे
फांदिच्या अंगावरती
चिमणी ती चिवचिवणारी
झाडात लपले सगे-सोयरे
हा गाव माझा जुना आठवांचा
नादात हसर्या या वाहत्या नदीचा
ढगात उरले पाऊसगाणे कसे साठवावे !
हातातले हात मन बावरे
खडकाची माया कशी पाझरे
भेटीच्या ओढीसाठी श्वासांचे झुंबर हलते
शब्दांना कळले हे गाणे नवे
ही वेळ आहे मला गोंदणारी
ही धुंद नाती गंधावणारी
पुन्हा एकदा उरी भेटता कसे आवरावे ?
No comments:
Post a Comment