Wednesday, May 7, 2014

Tu Niragas Chandrama Marathi song movie Manini.


तू निरागस चंद्रमा, तू सखी मधुशर्वरी
चांदणे माझ्या मनीचे पसरले क्षितिजावरी

काजळाचे बोट घे तू लावुनी गालावरी
मन्मनीचे भाव सारे उमलले चेहर्‍यावरी
पाहतो जेव्हा तुला मी गझल उमटे अंतरी
शब्द झाले सप्तरंगी झेप घेण्या अंबरी

सागराशी भेटण्या आतुर झाला हा रवी
भोवतीचे तेज सारे वाटते दुनिया नवी
हासता तू सूर ही झंकारले वार्‍यावरी
मी न माझी राहिले ही नशा जादुभरी

No comments:

Post a Comment