Tuesday, May 6, 2014

Preeticha Zhul Zhul Pani marathi song



प्रीतिचं झुळझुळ पाणी
वार्‍याची मंजुळ गाणी
रोमांची सर्वांगी गेले मी न्हाऊनी........२

हा जीव वेडा होई थोडा थोडा
वेड्या मनाचा बेफाम घोडा
दौडत आला सखे तुझा बंदा
चल प्रेमाचा रंगु दे विडा
साजणा मी तुझी कामिनी
प्रीतिचं झुळझुळ पाणी

मी धुंद झाले मनमोर डोले
पिसार्‍यातून हे खुणावित डोळे
डोळ्यांत जाळे, खुळी मीच झाले
स्वप्‍नफुलोरा मनात झुले
मी तुझा हंस ग मानिनी
प्रीतिचं झुळझुळ पाणी


No comments:

Post a Comment