(सांज वेळी सांज रंगी
रंगले मन हे
पावलांना साद देती या दिशा )- २
स न न सन सूर हे नवे
फुलून मन गाये त्या सवे
ओठावरी .. सरगम …
भिर भिर या अंबरी
नभाच्या ऊरी
वाटते ऊंच ऊंच विहारावे
रंग निळे जांभळे
ऊन कोवळे
घेऊनी पंखांवर मिरवावे
वाऱ्यातले सूर फुलवीत यावी ओठावरी
यावी ओठावरी – २ सरगम …
(गहिवर या क्षणी वाटते मनी
रेशमी स्वप्न नवे उमलावे …
नकळत यावे कुणी
हरपुनी भान असे बरसावे ) -२
मनातले अर्थ फुलवित यावे ओठावरी
यावी ओठावरी – २ सरगम …
(सांज वेळी सांज रंगी
रंगले मन हे
पावलांना साद देती या दिशा )- २
स न न सन सूर हे नवे
फुलून मन गाये त्या सवे
ओठावरी .. सरगम …
No comments:
Post a Comment