कसे सरतील सये, माझ्यावीना दिस तुझे सरताना आणि सांग सलतील ना ? गुलाबाचे फुलं दोन, रोज राती डोळ्यांवर मुसुमुसु पाणी सांग भरतील ना ? पावसाच्या धारा धारा, मोजताना दिस सारा रितेरिते मन तुझे उरे, ओठभर हसे हसे उरातून वेडेपिसे, खोल खोल कोण आंत झुरे आता जरा अळीमिळी, तुझी माझी व्यथा निळी सोसताना सुखावून हसशील ना ? कोण तुझ्या सौधातून्, उभे असे सामसूम चिडीचूप सुनसान दिवा, आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच, नभातून गोरा चांदवा चांदण्यांचे कोटी कण, आठवांचे ओले सण रोज रोज नीजभर भरतील ना ? इथे दूर देशी, माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी झडे सर कांचभर तडा, तुच तुच तुझ्या तुझ्या तुझी तुझी तुझे तुझे, सारा सारा तुझा तुझा सडा पडे माझ्या वाटेतून, आणि मग काट्यातून जातांनाही पायभर मखमल ना ? आता नाही बोलायाचे, जरा जरा जगायाचे माळूनीया अबोलीची फुले, देहभर हलू देत वीजेवर डुलू देत, तुझ्या माझ्या विरहाचे झुले जरा घन झुरू दे ना, वारा गुदमरू दे ना तेंव्हा नभ धरा सारी भिजवेल ना ?
Friday, May 23, 2014
Kase Sartil Saye Mazya Vina Dis Tuze,Marathi Song , Sandeep Khare
Subscribe to:
Post Comments (Atom)
धन्यवाद.
ReplyDeleteअशी मराठी गाणी आणखी असतील तर जरूर शेअर करा.
👌👌👌👌👌💐💐
ReplyDeletekhup chan gaana aahe
ReplyDelete