Wednesday, May 7, 2014

Shodhisi Manava Rauli Mandiri Marathi song



शोधिसी मानवा राऊळी, मंदिरी
नांदतो देव हा आपुल्या अंतरी

मेघ हे दाटती कोठुनी अंबरी ?
सूर येती कसे वाजते बासरी ?
रोमरोमी फुले तीर्थ हे भूवरी
दूर इंद्रायणी, दूर ती पंढरी

गंध का हासतो पाकळी सारुनी ?
वाहते निर्झरी प्रेमसंजीवनी
भोवताली तुला साद घाली कुणी
खूण घे जाणुनी रूप हे ईश्वरी

भेटतो देव का पूजनी अर्चनी ?
पुण्य का लाभते दानधर्मातुनी ?
शोध रे दिव्यता आपुल्या जीवनी
आंधळा खेळ हा खेळशी कुठवरी ?

3 comments: