एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी......२
फिरुनी नवी जन्मेन मी......
स्वप्नाप्रमाणे भासेल सारे, जातील सार्या लयाला प्रथा
भवती सुखाचे स्वर्गीय वारे, नाही उदासी ना व्यथा
ना बंधने नाही गुलामी, भीती अनामी विसरेन मी
हरवेन मी, हरपेन मी.…….२
तरीही मला लाभेन मी
एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी......२
फिरुनी नवी जन्मेन मी......२ 11१11
आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या, फुलतील कोमेजल्या वाचुनी
माझ्या मनीचे गूज घ्या जाणूनी, या वाहणार्या गाण्यातूनी
आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या, फुलतील कोमेजल्या वाचुनी
माझ्या मनीचे गूज घ्या जाणूनी, या वाहणार्या गाण्यातूनी
लहरेन मी, बहरेन मी.……२
क्षितीजातूनी उगवेन मी
एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी......२
फिरुनी नवी जन्मेन मी......२ 11२11
No comments:
Post a Comment