Tuesday, May 6, 2014

khel mandala full song of Natarang movie

 
तुझ्या पायरीशी कुनी सानथोर न्हाई
साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई
तरी देवा सरं ना ह्यो भोग कशापायी
हरवली वाट दिशा अंधारल्या दाही
ववाळुनी उधळतो जीव मायबापा
वनवा ह्यो उरी पेटला .... खेळ मांडला

सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा
तूच वाट दाखीव गा खेळ मांडला
दावी देवा पैलपार पाठीशी तू र्‍हा हुबा
ह्यो तुझ्याच उंबर्‍यात....  खेळ मांडला

उसवलं गनगोत सारं आधार कुनाचा न्हाई
भ्येगाळल्या भुईपरी जीनं अंगार जिवाला जाळी
बळ दे झुंजायाला किरपेची ढाल दे
इनविती पंचप्रान जिव्हारात ताल दे
करपलं रान देवा जळलं शिवार
तरी न्हाई धीर सांडला ... खेळ मांडला

No comments:

Post a Comment