Monday, May 5, 2014

Ek Dhaga Sukhacha-marathi songएक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे
जरतारी हे वस्त्र माणसा तुझिया आयुष्याचे.......... २

पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा, जासी उघडा........ २
कपड्यासाठी करिसी नाटक तीन प्रवेशांचे...........२
एक धागा सुखाचा…

मुकी अंगडी बालपणाची, रंगीत वसने तारुण्याची........ २
जीर्ण शाल मग उरे शेवटी लेणे वार्धक्याचे !......... २
एक धागा सुखाचा.....

या वस्‍त्राते विणतो कोण ? एक सारखी नसती दोन....... २
कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे !...... २
एक धागा सुखाचा......

No comments:

Post a Comment