Monday, May 5, 2014

Ugavali Shrukrachi Chandani-De dhakka-Marathi song

अडवू नका मज... सोडा आता, पुरं झालं ना.. धनी
उगवली…. 
उगवली शुक्राची चांदणी !.......४

अडवू नका मज... सोडा आता, पुरं झालं ना.. धनी
उगवली शुक्राची चांदणी !.......४
( हिचं ऐका पाव्हणं, काय हे वागणं शोभतंय्‌ व्हय्‌ तुम्हाला ?
हिचा हात धरून, गालामध्ये हसणं शोभतंय्‌ का तुम्हाला ?
जरा लाज धरा हो येता-जाता पाहिल्‌ ना हो कुणी ! )

उगवली शुक्राची चांदणी !......४

निरव शांतता अवतीभवती, रातकिडं हे किरकिर करती......२
भिरभिर उडती वर पाकोळ्या धडधड होते मनी
उगवली.... 
उगवली शुक्राची चांदणी !……४

लवलव करिती हिरवी पाती, चमचमणार्‍या चांदणराती…… २
वार्‍यावरती गंध दरवळे केतकीच्या या बनी
उगवली......
उगवली शुक्राची चांदणी !........४
(हिचं ऐका पाव्हणं, काय हे वागणं शोभतंय्‌ व्हय्‌ तुम्हाला ?
हिचा हात धरून, गालामध्ये हसणं शोभतंय्‌ का तुम्हाला ?
जरा लाज धरा हो येता-जाता पाहिल्‌ ना हो कुणी ! )
उगवली शुक्राची चांदणी !........४

No comments:

Post a Comment